---Advertisement---

संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत केलेले ५ क्रिकेटर्स

On: रविवार, मार्च 29, 2020 12:31 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. त्यामुळे संपूर्ण जगापूढे मोठे संकट उभे आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विविध स्तरातून केंद्र सरकार, राज्य सरकारला या संकटाविरुद्ध लढण्यासाठी मदत करण्यात येत आहे. त्याचबरोबर गरजूंच्या मदतीसाठीही अनेकजण पुढे आले आहेत. यामध्ये देशातील क्रिकेटपटूही मागे नाहीत. अनेक क्रिकेटपटूंनी कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी मोठी मदत केली आहे.

असे क्रिकेटपटू ज्यांनी कोरोना व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी केली मोठी मदत –

१. सचिन तेंडुलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ५० लाखांची मदत केली आहे. सचिनने ५० लाख रुपयांपैकी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर २५ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला दिले आहे.

२.सौरव गांंगुली – बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली ५० लाख रुपयांचे तांदुळ लॉकडाऊन दरम्यान गरजू लोकांना मोफत वाटणार आहे. त्यासाठी गांगुली आणि लाल बाबा तांदुळ यांच्यात करार करण्यात आला आहे.

३. इरफान पठाण आणि युसुफ पठाण – इरफान आणि युसुफ या पठाण बंधूंनी कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी ४००० मास्क दान केले आहेत. त्यांचे वडील चालवत असलेल्या महमूद खान पठाण चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने ते हे मास्क वडोदराच्या आरोग्य केंद्राला देणार आहे.

४. गौतम गंभीर – कोरोनाच्या उपचार आणि उपकरणामध्ये कोणतीही कमतरता भासू नये म्हणून गंभीरने त्याच्या खासदार निधीतून रुग्णालयांना ५० लाख रुपये दिले आहेत. तसेच त्याने २८ मार्चला दिलेल्या माहितीनुसार तो त्याच्या खासदार निधीतून १ कोटी रुपये आणि त्याच्या १ महिन्याचा पगार केंद्रिय मदत नीधीला देणार आहे.

५. सुरेश रैना –  भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत ५२ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील ३१ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधी आणि उर्वरित २१ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तो देणार आहे.

६. लक्ष्मी रतन शुक्ला – भारताचे वनडे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेला अष्टपैलू क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला त्याचे तीन महिन्याचे वेतन बंगालच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे.

७. अजिंक्य रहाणे – भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे १० लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे.

क्रिकेट संघटनांकडून करण्यात आलेली मदत – 

बीसीसीआय – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २८ मार्चला जाहीर केले की त्यांच्यातर्फे ५१ कोटी रुपये पंतप्रधान आप्तकालिन परिस्थिती सहाय्यक निधीला देण्यात येणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन – कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाख रुपये देणार आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशन – बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून २५ लाख रुपये पश्चिम बंगाल आप्तकालिन सहाय्यक निधीला देण्यात येणार आहेत. तसेच बंगाल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अविषेक दालमिया वैयक्तिकरित्या ५ लाखांची मदत देणार आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रत्येकी २१ लाख रुपये गुजराजच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधीला आणि पंतप्रधान सहाय्यक निधीला देणार आहे.

ट्रेडिंग घडामोडी – 

ज्या बीसीसीआयला लोकांनी ट्रोल केले, त्यांनी एका झटक्यात दिले एवढे कोटी

रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान

असा एक सल्ला ज्याने स्टिव स्मिथचे आयुष्यचं टाकले बदलून

टी२०मध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेले ५ खेळाडू

टाॅप ५- क्रिकेटमध्ये ट्वेंटी२० कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, एकही भारतीयाचे नाव नाही यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---