कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला थांबविण्यासाठी क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे.
यामध्ये भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत ५२ लाख रुपयांची मदत (Help of 52 Lakh Rupees) करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील ३१ लाख रुपये पंतप्रधान मदत निधी (Prime Minister’s Relief Fund) आणि उर्वरित २१ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये (Chief Minister Relief Fund) देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसबद्दल रैनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून लोकांना आवाहन केले आहे. यामध्ये तो म्हणाला की, “प्रत्येकाने योगदान करा आणि घरातच रहा.”
यापूर्वी भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ५० लाख रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये त्याने २५ लाख रुपये पंतप्रधान मदत निधी आणि २५ लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दिले आहेत.
याव्यतिरिक्त बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly), पी.व्ही. सिंधू (P.V. Sindhu), गौतम गंभीर (Gautam Gambhir) या खेळाडूंनी या व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपापल्या परीने योगदान दिले आहे.
त्याचबरोबर बीसीसीआयने कोरोना व्हायरसविरुद्धच्या (Corona Virus) लढाईत पंतप्रधान मदत निधीमध्ये ५१ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सचिव जय शहाने (Jay Shah) यामध्ये मोठे कार्य करत योगदान करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्यास मदत केली. तसेच त्याने इतर अधिकारी आणि राज्य असोसिएशनशीसुद्धा चर्चा केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टी२०मध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेले ५ खेळाडू
-टाॅप ५- क्रिकेटमध्ये ट्वेंटी२० कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, एकही भारतीयाचे नाव नाही यात