इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. हा सामना मंगळवारी (दि. २४ मे) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पार पडला. गुजरातने फलंदाजांच्या जोरावर या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करत ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यादरम्यान राजस्थानचा अष्टपैलू रियान पराग याने अशी काही कृती केली की, त्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. आधी फलंदाजीदरम्यान फ्री हिट मिळण्यावर धावबाद झाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना त्याने आपला राग दुसऱ्या खेळाडूवर व्यक्त केला.
झाले असे की, राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या डावाचा शेवटचा चेंडू नो बॉल होता. या चेंडूवर जोस बटलर (Jos Buttler) धावबाद झाला. अशात चेंडू फ्री हिट असताना नवीन फलंदाज आर अश्विन (R Ashwin) खेळपट्टीवर आला. अश्विनला यश दयाल (Yash Dayal) याने वाईड चेंडू टाकला. दुसरीकडे, रियान पराग (Riyan Parag) आपली क्रीझ सोडून धाव घेण्यासाठी धावला. त्याने पाहिले देखील नाही की, अश्विनने क्रीझवरून हालचालही केली नाही. मात्र, चेंडू गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याच्या हातात गेला होता.
साहा याने चेंडू यशकडे फेकला आणि परागही धावबाद झाला. अशात परागने आपली चूक स्वीकारली नाही, तर त्याने अशी काही कृती करत होता की, सर्व चूक अश्विनची आहे. दुसरीकडे, क्षेत्ररक्षणादरम्यान असे काही घडले की, जेव्हा परागने मिड ऑफवरून धावत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरजवळ रोखला. मात्र, देवदत्त पडिक्कल चेंडूपर्यंत पोहोचला नाही, तर परागचा पारा इथेही चांगलाच चढला होता. असे एका डावात दोनदा पाहायला मिळाले. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “रियान परागचा स्वभाव विराट कोहलीसारखा आहे, पण कामगिरी विजय शंकरसारखी आहे.”
Riyan Parag starter pack.#GTvRR pic.twitter.com/ZZU7f98ZHU
— s (@theesmaarkhan) May 25, 2022
@ParagRiyan check ur stats in batting ur calling urself finisher /alrounder all u do is catch practice pic.twitter.com/TInt2B0Gud
— sivasakthi_18 (@Sivasakthisrini) May 24, 2022
Riyan Parag has the attitude of Virat Kohli and the skill of Riyan Parag.
— Gabbar (@GabbbarSingh) May 24, 2022
I wish my employers will hire me for the reason Riyan Parag is hired for RR. Full on entertainment, no work load, sledging seniors at times, and dance ofcourse
— The Vipul Vaibhaw (@vipul__vaibhaw) May 24, 2022
This riyan parag literally abused harshal Patel, padikkal, siraj
Mocked umpires unwantedly and didn't even got punished for it, Staring Ashwin as if it is Ashwin's mistake
Pipe down boi, you're not replicating Virat, you're way worse than krunal.
— Marc𝕏 Spector (@Shy1469) May 24, 2022
Garba Queen Riyan Parag attitude is like he scored 700+ runs 😂#GTvsRR #RRvGT #riyanparag pic.twitter.com/Iw6eOmtZIa
— SOLELY POLITICS 🇮🇳 (@charsau20) May 24, 2022
https://twitter.com/time__square/status/1529155271851143168?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529155271851143168%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.news18.com%2Fnews%2Fbuzz%2Fipl-fans-remind-riyan-parag-he-is-no-virat-kohli-ask-him-to-keep-his-attitude-in-check-5240503.html
Riyan Parag abusing Padikkal for absolutely no reason
This kid is going to get hurt real bad one day in front of his daddy #GTvsRR— Aditya (@statshater) May 24, 2022
Day won't be long if Riyan parag keeps scolding his team mates one or other will scold him in return.
— Sai (@akakrcb6) May 24, 2022
गुजरातची जबरदस्त कामगिरी
गुजरात टायटन्स संघाने आयपीएलच्या १५व्या हंगामात पहिल्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तसेच, या सामन्यात त्यांनी राजस्थानला धूळ चारत थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला. गुजरातकडून डेविड मिलर (David Miller) याने ६८ धावा, हार्दिक पंड्या याने ४० धावा, शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी प्रत्येकी ३५ धावा चोपल्या. राजस्थानविरुद्ध विजय मिळवत त्यांनी पहिलाच हंगाम खेळताना थेट अंतिम सामना गाठणाऱ्या संघांच्या यादीत आपलेही नाव नोंदवले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजय किती खास? चेन्नईनंतर अशी संधी फक्त आता गुजरातच्या वाट्याला आलीये
‘फ्लाइंग कौर’! हवेत झेपावत हरमनप्रीतने घेतला अप्रतिम झेल; Video भन्नाट व्हायरल
गुजरातच उचलणार आयपीएल ट्रॉफी? आकडेवारी देतायेत ग्वाही, तब्बल १० वेळा झालंय ‘असं’