जगप्रसिद्ध फुटबाॅलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने एक विश्वविक्रमाची नोंद त्याच्या नावावर केली आहे. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमध्ये जगातील सर्वाधिक गोल करणारा फुटबाॅलपटूचा मान मिळवला आहे. त्याने हा विक्रम विश्वचषकाच्या क्वालिफायर सामन्यामध्ये केला आहे.
त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमध्ये १११ गोल नावावर केले आहेत. यासह त्याने ईरानसाच्या अली देईचा विक्रम मोडीत काढला आहे आणि स्वत:चे नाव या विश्वविक्रमावर कोरले आहे. अली देईने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०९ गोल केले आहेत. रोनाल्डोने आधीच २०२० मध्ये अली देईच्या या सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. आता त्याने हा विक्रम मोडला आहे.
पोर्तुगालच्या संघासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना रोनाल्डोने आयर्लंडच्या विरुद्ध ८९ व्या मिनिटाला पहिला गोल केला होता. त्यानंतर इंजरी टाइमच्या दरम्यान संघासाठी दुसरा गोल करत संघाला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. त्याने या सामन्यात त्याचे दोन्ही गोल हेडने केले आहेत.
???????? All-time top international scorer Cristiano Ronaldo has 111 goals in 180 games for Portugal ????#WCQ pic.twitter.com/G3XItWOiEe
— UEFA EURO (@UEFAEURO) September 1, 2021
रोनाल्डोने हा विश्वविक्रम केल्यानंतर त्याचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. फक्त यासाठी नाही की मी विक्रम मोडला आहे. तर त्या खास क्षणासाठी जो आमच्या जवळ होता. संघाने जे केले त्याचे कौतुक करावेच लागेल, आम्हाला सामन्याच्या शेवटपर्यंत जिंकण्याचा विश्वास होता. मी खूप आनंदी आहे.”
BREAKING: @cristiano scores twice for Portugal and becomes the greatest goalscorer in international football history.
He is, indisputably, the ????
???????????????????????? pic.twitter.com/tLXXVHwApx— Piers Morgan (@piersmorgan) September 1, 2021
पोर्तुगाल चार सामन्यांत १० गुणांसह ग्रुप एमध्ये पहिल्या स्थानावर आहे. असे असले तरीही सर्बिया त्यांच्यापेक्षा केवळ तीन गुणांनी मागे आहे आणि त्यांचा संघ आणखी एक सामना खेळणार आहे. त्यामुळे सर्बिया पोर्तुगालला गुणतालिकेत मागे टाकू शकतोय
महत्त्वाच्या बातम्या-
ओ शेठ! मेस्सी रोनाल्डोच्या फॅनची अफलातून रिल्स, लाखो व्हूव्जचा पडतोय पाऊस
तब्बल ‘एवढ्या’ कोटी रुपयांचे नुकसान पत्करून रोनाल्डो खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
प्रेक्षकांचे आक्षेपार्ह कृत्य!! चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी






