क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक आहे. मॅनचेस्टर युनायटेड क्लबचा तो महान खेळाडू आहे, तर राष्ट्रीय संघ पोर्तुगालचा कर्णधार देखील आहे. रोनाल्डोचा महागड्या गाड्यांचा छंड कोणापासून लपून राहिला नाहीये. त्याच्याकडे एकापेक्षा एक गाड्यांचे कलेक्शन आहे, ज्यांची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. मात्र सोमवारी (२० जून) त्याच्या अशाच एका महागड्या गाडीचा अपघात झाला, ज्याची किंमत सुमारे १.७ मिलियन पाउंड्स म्हणजेच १६ कोटी २८ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
रोनाल्डोच्या ज्या महागड्या गाडीचा अपघात झाला, तिचे नाव बुगाटी वेरॉन (Bugatti Veyron) आहे. स्पेनच्या मालोर्का शहरात हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याने स्वतःची ही महागडी बुगाटी वेरॉन गाडी समुद्रकिनाऱ्यावर बोलवली होती. पण यादरम्यानच गाडीचा अपघात झाल्याचे उघडकीस आले.
यामध्ये चांगली बातमी ही आहे की, अपघात झालेल्या गाडीत स्वतः रोनाल्डो बसलेला नव्हता किंवा, तो गाडी चालवत नव्हता. त्याचा बॉडीगार्ड ही गाडी समुद्रकिनाऱ्यावकडे घेऊन चालला होता आणि त्यावेळी हा अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी एका घरात घुसली, अशी माहिती मिळाली आहे. गाडी चालवणाऱ्याला कसल्याही प्रकारची दुखापती झालेली नाहीये. वृत्तानुसार रोनाल्डोची ही गाडी स्पेनच्या मजार्को शहरातीलच एका लहान घरात घुसली आहे.
माध्यांतील वृत्तानुसार रोनाल्डोची सुपर- कार बुगाटी वेरॉनला समोरच्या बाजुने जास्त नुकसान झाले आहे. हा अपघात स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ च्या सुमारास झाला आहे. रोनाल्डो या गाडीत उपस्थित नसल्यामुळे त्याचे चाहते देवाचे आभार मानत आहेत. अशी माहिती मिळाली आहे की, रोनाल्डो १० दिवसांच्या सुट्टीवर आहे. तो सध्या समुद्रकिनाऱ्यावर ज्या विलावर मुक्कामी आहे, त्या विलाचे एका रात्रीचे भाडे १० लाख रुपये सांगितले जात आहे. सुट्टीवर त्याची पार्टनर आणि मुलेही सोबत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभच्या नेतृत्त्वाबद्दल प्रशिक्षक द्रविडचे मोठे भाष्य; म्हणाले, ‘सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर..’
डेक्कन इलेव्हन, रेंजहिल्सचे संघर्षपूर्ण विजय
VIDEO । १७ वर्षीय गोलंदाजाची फिरकी पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकदम कडक!’