चार वेळेसचा बॅलोन दोर पुरस्कार विजेता खेळाडू, पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि रिअल माद्रिद संघाचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने त्याचा एक बॅलोन दोर पुरस्कार एका चांगल्या कामासाठी लिलावाला काढला होता. त्याने ‘मेक अ विश’ या संस्थेसाठी आपला पुरस्कार विक्रीस काढला होता.
‘मेक अ विश’ ही लंडन येथील एक जगप्रसिद्ध सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था अश्या लहान मुलांसाठी काम करते जे दिव्यांग आहेत किंवा त्यांना काही दुर्मय आजार झालेला असते. ‘मेक अ विश’ या संस्थेत अश्या लहान मुलांच्या काही खूप मोठ्या विश पूर्ण केल्या जातात ज्या सहजासहजी शक्य होत नाहीत.
या संस्थेसाठी रोनाल्डोने त्याला मिळालेल्या २०१३ सालच्या बॅलोन दोर पुरस्काराची प्रतिकृती दिली होती जी रिअल माद्रिद संघासाठी खेळताना प्रथम जिंकलेला होता. रोनाल्डोने पहिला बॅलोन दोर पुरस्कार मँचेस्टर युनाइटेड संघासाठी खेळताना २००८ जिंकला होता. त्यानंतर त्याने २०१३, २०१४, २०१६ साली हा पुरस्कार रिअल माद्रिद संघाकडून खेळताना मिळवला आहे.
या पुरस्काराला लिलावात तब्बल ६००,००० युरो इतकी रक्कम बोली लावून इस्राईल मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या इदान ओफर यांनी या पुरस्काराची प्रतिकृती मिळवली.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
# बॅलोन दोर पुरस्कार मिळवणारा खेळाडू ज्या संघातून खेळत असतो त्या संघाला बॅलोन दोर पुरस्काराची प्रतिकृती देण्यात येते. तर मुख्य पुरस्कार त्या खेळाडूंकडे असते.