मॉस्को | रविवारी (15 जुलै) फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 असे पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावले.
संपूर्ण स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या क्रोएशियाचा अंतिम सामन्यात निराशाजनक पराभव झाला.
या सामन्यानंतर क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीकला पराभवाचे दुख: असह्य झाले होते. यावेळी मैदानावर रडणाऱ्या लुका मॉड्रीकचे सांत्वन करत क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्रॅबर किटारोव्हिच यांनी मॉड्रीकचे डोळे पुसले.
क्रोएशियन राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्रॅबर किटारोव्हिच यांच्या या कृतीने त्यांनी जगभरातील करोडो फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली.
2018 च्या फिफा विश्वचषकाला सुरवात होताना जागतिक फिफा फु़टबॉल क्रमवारीत 20 व्या स्थानी असलेला संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारेल असे कोणालाही वाटत नव्हते.
क्रोएशियाने गट फेरीत लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटीनाला तर उपांत्य सामन्यात इंग्लंडला पराभवाचे धक्के देत अंतिम फेरी गाठली होती.
सर्वोत्तम सांघिक कामगिरी करत क्रोएशियाने 2018 फिफा विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
-१९ वर्षीय किलियन एम्बापेचे कौतुकास्पद पाऊल
-आशियाई क्रिडा स्पर्धेत गतविजेत्या भारतीय हॉकी संघाची हॉंगकॉंगशी सलामी