---Advertisement---

भारतच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सामन्यांना सुरुवात

Team-India
---Advertisement---

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत १-० ने मालिका आपल्या नावावर केली. आता भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. येत्या काही दिवसात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. परंतु, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार ऑम्रीकॉनचा प्रादुर्भाव असल्यामुळे या दौऱ्यातील वेळापत्रकात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये पार पडणार होता. परंतु, आता ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर म्हणजे ‘बॉक्सिंग डे’ला सुरू होणार आहे. हा सामना सेंचूरियनच्या मैदानावर पार पडणार आहे, तर दुसरा कसोटी सामना पुढच्या वर्षी ३ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. तसेच मालिकेतील अंतिम कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर पार पडणार आहे.

तसेच ३ वनडे सामन्यांची मालिका १९ जानेवारी पासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना १९ जानेवारी रोजी खेळला जाईल, तर दुसरा वनडे सामना २१ आणि २३ जानेवारी रोजी पार पडणार आहे.

या दौऱ्यावर टी२० मालिका देखील पार पडणार होती. परंतु, ही मालिका रद्द न करता पुढे ढकलण्यात आली आहे. कसोटी मालिका ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळली जाणार आहे, तर वनडे मालिका आयसीसी विश्वचषक सुपर लीग स्पर्धेच्या अंतर्गत पार पडणार आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी,केप टाऊन

वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पार्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पार्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केप टाऊन

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा सेहवागने १० गडी बाद करणाऱ्या एजाजला दिला होता चोप, स्वत: गोलंदाजानेच दिला आठवणींना उजाळा

न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज, ‘या’ ३ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

मोठी बातमी: हरभजन करणार निवृत्तीची घोषणा? आयपीएलमध्ये मेंटर बनण्याची आली ऑफर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---