सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. परंतु, ऑमीक्रॉनची भीती पाहता हा दौरा होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु, आता बीसीसीआयने या दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
दक्षिण आफ्रिकेत ऑमीक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचे परिणाम भारतात देखील दिसून आले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, आता बीसीसीआयने हा दौरा होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांची मालिका ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर ४ टी२० सामन्यांची मालिका तत्काळ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
हा दौरा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता. परंतु, आता हा दौरा नव्या वेळापत्रकानुसार २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर भारतीय संघ ९ डिसेंबर रोजी या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणारे कसोटी सामने हे अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण हे सामने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत होणार आहेत.
त्यामुळे या सामन्यांमध्ये भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. ही मोठी मालिका पाहता, बीसीसीआयने न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे.
असे होते भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे पूर्वीचे वेळापत्रक
कसोटी मालिका
१)पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१, जोहान्सबर्ग
२)दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१, सेंच्युरियन
३)तिसरा कसोटी सामना – ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२२,जोहान्सबर्ग
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – ११ जानेवारी २०२२, पार्ल
२)दुसरा वनडे सामना -१४ जानेवारी २०२२,केपटाऊन
३)तिसरा वनडे सामना -१६ जानेवारी २०२२,केपटाऊन
टी-२० मालिका
१)पहिला टी -२० सामना – १९ जानेवारी २०२२,केपटाऊन
२) दुसरा टी-२० सामना – २१ जानेवारी,२०२२,केपटाऊन
३)तिसरा टी -२० सामना – २३ जानेवारी,२०२२, पार्ल
४)चौथा टी -२० सामना -२६ जानेवारी,२०२२, पार्ल
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ११० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास