इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करताना 15 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो याने केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चेन्नई येथे झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गतविजेत्या गुजरातला 15 धावांनी पराभूत केले. यासह त्यांनी तब्बल दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत बोलताना ब्राव्हो म्हणाला,
“आम्ही उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत आलो आहोत. मात्र प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सचा सामना आम्हाला करावा लागू नये अशी इच्छा आहे. कारण ही गोष्ट माझ्यासाठी खूप भावनिक असते.”
ब्राव्होने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात मुंबईसाठी खेळताना केली होती. मात्र, त्यानंतर चेन्नईसाठी खेळताना त्याने मोठे नाव कमावले. मागील वर्षी निवृत्त झाल्यानंतर त्याला चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दुसरीकडे चेन्नईची मुंबईविरुद्ध अंतिम फेरीतील कामगिरी खराब राहिली असून, चार पैकी तीन सामन्यात मुंबईला विजय मिळवण्यात यश आलेले.
त्याचवेळी मुंबईने आपल्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सला 81 धावांनी पराभूत करत क्वालिफायर दोन मध्ये धडक मारली. येथे त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यापूर्वीच अंतिम फेरीत पोहोचलेल्या चेन्नईला आपले पाचवे विजेतेपद पटकावण्याची संधी असेल. तर, मुंबई आपल्या सहाव्या व गुजरात दुसऱ्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.
(CSK Bowling Coach Dwayne Bravo Don’t Want IPL Final Against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुट्टी नाही! लखनऊ पराभूत होताच मुंबईच्या खेळाडूंनी उडवली नवीनची खिल्ली, सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड