आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (8 एप्रिल) सर्वात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान होणार असलेल्या या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी सीएसके गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
चेन्नईची या स्पर्धेतील सुरुवात संमिश्र राहिली आहे. उद्घाटनाच्या सामन्यात चेन्नईला गतविजेत्या गुजरात टायटन्सने पराभूत केले. मात्र, दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनऊ सुपरजायंट्सला मात दिली. असे असताना चेन्नईचे गोलंदाज दोन्ही सामन्यात चांगलेच महागडे ठरले होते. चेन्नईच्या युवा गोलंदाजावर विरोधी संघांच्या फलंदाजांनी चांगलेच आक्रमण केले. तुषार देशपांडे व दीपक चहर हे डेथ ओवर्समध्ये धावा रोखण्यात अपयशी ठरलेले. हाच धागा पकडून संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो यांनी प्रतिक्रिया दिली.
ब्राव्हो म्हणाले,
“तुमच्या गोलंदाजीमध्ये वेग नाही आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने यॉर्कर चेंडू टाकू शकत नाही, तर तुमचे वाचणे कठीण होऊन बसते. तुमच्याकडे 150 किमी प्रतितास इतका वेग असेलही, मात्र तुमच्याकडे नियंत्रण नसेल तर तुम्ही महागडे ठरता. या सर्वात यॉर्कर चेंडू सर्वात प्रभावी आहेत.”
चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या दोन सामन्यात अजिबात प्रभावी कामगिरी केली नव्हती. युवा राजवर्धन हंगरगेकर हाच केवळ संघाच्या रणनीतीनुसार गोलंदाजी करू शकलेला. दीपक चहर याला लय मिळालेली नाही. त्यामुळे तो महागडा ठरतोय. पहिल्या दोन सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या तुषार देशपांडे याने मोक्याच्या क्षणी बळी मिळवले आहेत. मात्र, सर्वाधिक अवांतर धावा दिल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. संघाचे फिरकीपटू मात्र अपेक्षित कामगिरी करताना दिसत आहेत.
(CSK Bowling Coach Dwayne Bravo Statement On Death Overs Bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू तडकाफडकी मायदेशी रवाना! जाणून घ्या कारण
मुंबई इंडियन्सपेक्षाही जास्त ‘ही’ टीम उधळते चीअरलीडर्सवर पैसा, दुसऱ्या स्थानावर RCB