आयपीएल इतिसाहासातील २ सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गुरुवारी (२१ एप्रिल) आमना सामना झाला. उभय संघांमध्ये झालेला हा सामना चेन्नईने ३ विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या ५ चेंडूंमध्ये चेन्नईला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता असताना एमएस धोनीने १ षटकार आणि २ चौकार मारत संघाला सामना जिंकून दिला. हा चेन्नईचा हंगामातील दुसरा विजय होता. तर मुंबईला सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामना विजयानंतर चेन्नईचा विद्यमान कर्णधार रविंद्र जडेजा याने प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात (MI vs CSK) मुंबईने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला १५६ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून वरच्या फळीत अंबाती रायुडू (४० धावा) आणि रॉबिन उथप्पा (३० धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. परिणामी सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. परंतु धोनीने (MS Dhoni) १३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत २१५ च्या स्ट्राईक रेटने २८ धावा करत संघाला सामना जिंकून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
धोनीच्या फिनिशरच्या (MS Dhoni Finisher) भूमिकेविषयी बोलताना जडेजा (Captain Ravindra Jadeja) म्हणाला की, “ज्याप्रकारे सामना चालू होता, ते पाहून आम्ही खूप दबावात होतो. परंतु अजून चेन्नईचा सामना फिनिशर धोनी मैदानावर यायचा होता. त्यामुळे आम्हाला माहिती होते की, आमच्याकडे अजून एक संधी आहे. धोनीही अजूनही आमच्या सोबत आहे आणि आमच्यासाठी विजयी भूमिका निभावत आहे.”
धोनीप्रमाणेच वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) याचाही या सामना विजयात महत्त्वाचा वाटा राहिला. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत पावरप्लेमध्ये संघाला ३ विकेट्स मिळवून दिल्या. त्याच्या प्रदर्शनाबद्दल बोलताना कर्णधार जडेजा म्हणाला, “मुकेशने चांगली गोलंदाजी केली आणि पावरप्लेमध्ये तो आमच्यासाठी दमदार प्रदर्शन करत आहे. जरी आम्ही सामना जिंकत नसलो, तरीही आम्ही सामना जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत.”
तसेच या सामन्यादरम्यान कर्णधार जडेजाकडून एक चूक झाली होती. त्याच्या हातून मुंबईचा पदार्पणवीर हृतिक शोकिन याचा एक झेल सुटला होता. आपल्या या चुकीबद्दल बोलताना जडेजा म्हणाला की, “हे सतत होत असते. याचमुळे मी कधीही क्षेत्ररक्षणाला हलक्यात घेत नाही आणि कठोर मेहनत घेत असतो. आम्हाला अजूनही आमच्या क्षेत्ररक्षणावर काम करण्याची गरज आहे. आम्ही झेल सोडण्याची जोखिम घेऊ शकत नाही.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या चुकांवर सचिनच्या शब्दांचे पांघरुण; म्हणतोय, ‘युवा संघ आहे, चुकांमधून…’
रोहित-विराटची विकेट घेणारा कोण आहे मुकेश चौधरी? महाराष्ट्र संघासाठीही केलीय दमदार कामगिरी
मुकेश चौधरीच्या यॉर्करवर गोंधळला इशान किशन, कोसळला मैदानावर अन् इकडे उडून पडले स्टंप्स