क्रिकेटजगतात भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनी याचा चाहतावर्ग मोठा आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपला जलवा दाखवताना दिसत आहे. आगामी आयपीएल 2025 हंगामात धोनीला रिटेन करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने बीसीसीआयकडे एक नियम आणण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
आयपीएलच्या पहिल्या सत्रात एक नियम आणण्यात आला होता. या अंतर्गत, कोणतीही फ्रेंचायझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत कमी पैशात खरेदी करू शकते. त्यासाठी अट एवढीच होती की त्यांच्या निवृत्तीला 5 वर्षे झाले असावेत. हा नियम 2021 मध्ये बीसीसीआयने काढून टाकला कारण तो कधीही वापरला गेला नाही. मात्र 31 जुलै रोजी फ्रँचायझींच्या झालेल्या बैठकीत सीएसकेने धोनीला खेळवण्यासाठी हा नियम परत आणण्याची मागणी केली होती. खूप कमी फ्रँचायझींनी सीएसकेचे समर्थन केले होते, असे म्हटले जात होते.
दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सत्य उघड केले आणि सांगितले की त्यांच्या बाजूने अनकॅप्ड खेळाडू नियम लागू करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. विश्वनाथन म्हणाले, “मला याबद्दल काहीही माहिती नाही. आम्ही अनकॅप्ड नियमाची मागणीही केलेली नाही. बीसीसीआय स्वतः ‘अनकॅप्ड प्लेअर रूल’ सुरू ठेवण्याच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.”
जुन्या अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमावर नजर टाकल्यास, एका खेळाडूला कायम ठेवण्यासाठी संघाला 4 कोटी रुपये खर्च करावे लागतात. पण धोनीचा सध्याचा पगार 12 कोटी रुपये आहे, त्यामुळे अनकॅप्ड नियम लागू झाल्यास धोनीला थेट 8 कोटी रुपयांचे नुकसान होईल. आयपीएल 2024 मध्ये धोनीने सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे, त्यामुळे त्याच्या पुढील हंगामात खेळण्याबाबत अजूनही शंका आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
18 वर्षीय फलंदाजानं शानदार शतक झळकावून रचला इतिहास!
युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक का होणार? पाहा 3 मोठी कारणे
‘बाबर आझम’ नाही तर हे 3 स्टार फीट क्रिकेटर्स, माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य