आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) खेळण्यात येईल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. रविवारी पावसामुळे नाणेफेक देखील न झाल्याने सर्वच जण निराश झाले. हा सामना पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक अहमदाबाद येथे पोहोचले होते. यातीलच काही चाहत्यांनी सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार असल्याने अहमदाबाद येथे राहणे पसंत केले. रात्री उशिरा राहण्याचे कोणतेही ठिकाण न शोधता काहींनी थेट रेल्वे स्टेशनचा आसरा घेतला.
रविवारी (28 मे) सायंकाळी सात वाजता नाणेफेक होऊन 7:30 वाजता सामना सुरू होणार होता. मात्र, सायंकाळी 6 वाजल्यापासून अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर सामना सुरू होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली होती. नऊ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांसाठी पाऊस थांबला. त्यावेळी अगदी पंधरा-वीस मिनिटांच्या अत्यल्प कालावधीत मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान खेळण्यासाठी तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अकरा वाजेपर्यंत पाऊस न थांबल्याने अखेर सामना सोमवारी खेळण्याचे घोषित करण्यात आले.
हा सामना पाहण्यासाठी जगभरातून तसेच भारतभरातून अनेक प्रेक्षक अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. काहींचे तर पहाटेच माघारी परतण्याचे नियोजन होते. मात्र, सामना दुसऱ्या दिवसावर ढकलल्याने अनेकांची राहण्याची गैरसोय झाली. त्यावेळी काही चाहत्यांनी थेट रेल्वे स्टेशनवर झोपण्याचा निर्णय घेतला. ही छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.
(CSK & cricket fans were sleeping at the railway station as the IPL final is postponed to Monday due to rain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
“तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया