आयपीएल २०२६ मध्ये शुक्रवारी (१५ मे) एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज भिडले. प्लेऑफच्या दृष्टीने चेन्नईसाठी हा सामना महत्वाचा होता आणि त्यांनी तो गमावला. हा सामना लखनऊने ७ विकेट्सने जिंकला आणि गुणतालिकेत चेन्नई सहाव्या स्थानी घसरला. या हंगामात चेन्नईचे अजून दोन सामने बाकी आहे, ते सामने जिंकले तरी ते सहज प्लेऑफमध्ये पोहोचणार नाहीत. त्यांना आता इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागले. त्यांचा या पराभवाचा मात्र दोन संघांना मोठा फायदा झाला आहे.
आयपीएलच्या या १९ व्या हंगामाची प्लेऑफ शर्यत पाहिली तर सध्या आठ संघ त्यामध्ये आहेत, कारण दोन संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. त्यामध्ये लखनऊबरोबर मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. या दोन्ही संघांनी १२ पैकी ४ सामने जिंकले असून ते स्पर्धेबाहेर झाले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या थोड्याफार संधी आहेत.
गुणतालिकेत पाहिले तर पहिल्या चार स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे प्लेऑफसाठीचे प्रबळ दावेदार आहेत. यामधील बंगळुरू आणि गुजरातचे प्रत्येकी १६-१६ पॉइंट्स आहेत. तसेच हैद्राबाद १४ पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांचे पुढील सामने चेन्नई आणि बंगळुरू विरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास ते जास्तीत जास्त १८ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. पंजाब किंग्ज सध्या चौथ्या स्थानी आहेत.
प्लेऑफच्या शर्यतीसाठी पंजाब, चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या तिन्हीमध्ये चुरशीची लढत आहेत. चेन्नईच्या पराभवाचा राजस्थान आणि पंजाबा मोठा फायदा झाला आहे. पंजाब १३ पॉइंट्ससह पहिल्या चार संघांमध्ये कायम आहे, राजस्थान १२ पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
मागील पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या पंजाबला उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत १७ पॉइंट्सपर्यंत पोहोचता येईल. राजस्थानचे तीन सामना बाकी असून त्यांनी १८ पॉइंट्सपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. तसेच चेन्नईला मात्र त्यांचे बाकी राहिलेले दोन्ही सामने जिंकत १६ पॉइंट्सपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर इतर संघांनी त्यांचे सामने गमावले तरच त्यांना प्लेऑफसाठी पात्र होण्याची संधी आहे.






