---Advertisement---

‘कर्वे नगरच्या पोरी, जगात भारी’, हटके पोस्टरमुळे सीएसकेचा पुणेकर चाहता आला चर्चेत

On: सोमवार, मे 9, 2022 8:31 AM
---Advertisement---

आयपीएल, या जगप्रसिद्ध टी२० लीगमध्ये दिसणारा चेहरा रातोरात प्रसिद्ध होतो. अगदी खेळाडूंपासून ते दर्शकांपर्यंत सर्वांना ही गोष्ट लागू होते. आजवर बऱ्याच मिस्ट्री गर्ल्स, क्रिकेटपटूंकडे वेगवेगळ्या मागण्या करणारे पोस्टर्स घेऊन स्टेडियममध्ये उभे असलेले चाहते, इत्यादी कॅमेरामनचे लक्ष वेधताना दिसतात. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२च्या ५५व्या सामन्यादरम्यानही असेच काहीसे पाहायला मिळाले.

चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) चीयर करण्यासाठी गेलेला एक चाहता (CSK Fan) आगळेवेगळे पोस्टर हाती घेऊन दिसला, ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

डोक्यावर पांढरी टोपी आणि अंगावर सीएसकेची जर्सी असलेल्या या पुणेकर चाहत्याने आपल्या हातातील पोस्टरवर पुणेकरांना त्यातही खासकरून कर्वे नगरवासी मुलींना भावणाऱ्या काही ओळी लिहिल्या होत्या. ‘कर्वेनगरच्या पोरी, जगात भारी‘, असे (Karve Nagar Girls) त्या चाहत्याने आपल्या हातातील पोस्टरवर लिहिले होते. त्याच्या या गमतीशीर पोस्टरमुळे तो चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/CdTmj50qP7O/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, सीएसके (Chennai Super Kings) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या आणि दिल्लीपुढे २०९ धावांचा डोंगर उभा केला. सीएसकेकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वे याने सर्वाधिक ८७ धावा फटकावल्या. केवळ ४९ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली. त्याच्याबरोबरच सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानेही ४१ धावांचे योगदान दिले. तसेच एमएस धोनीनेही ८ चेंडूत २१ धावा जोडल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला फक्त ११७ धावाच करता आल्या आणि १७.४ षटकात दिल्लीचा संघ सर्वबाद झाला. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक २५ धावा केल्या. तसेच शार्दुल ठाकूरने २४ आणि कर्णधार रिषभ पंतने २१ धावा केल्या. या डावात चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि ड्वेन ब्रावो यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. त्यामुळे चेन्नईने हा सामना ९१ धावांनी जिंकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

ऋतुराजने विरोधी संघाच्या वेगवान गोलंदाजाचे गायले गोडवे; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है’

दिल्लीचं नशीबच फुटकं! चेन्नईविरुद्ध पराभूत होताच नावावर झाला नकोसा विक्रम; प्लेऑफसाठी करावा लागेल संघर्ष

दिल्लीविरुद्ध २१ धावा चोपताच धोनीच्या नावावर दोन मोठ्या विक्रमांची नोंद, एकात पटकावला थेट अव्वल क्रमांक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---