इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांमुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना रविवारी (१९ सप्टेंबर ) प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिलीच लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात २९ सामने खेळले गेले होते. तर उर्वरित ३१ सामने युएईमध्ये पार पडणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना रविवारी (१९ सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे पारडे जड आहे. कारण आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघावर ४ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघ जोरदार विजय मिळवून व्याजासह परतफेड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
सध्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एकूण ७ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
तसेच मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
अशातच जर चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले तर चेन्नई सुपर किंग्स संघ दिल्ली कॅपिटल्स संघाला मागे टाकत १२ गुणांसह अव्वल स्थान गाठू शकतो. तर मुंबई इंडियन्स संघाने जर चेन्नई संघावर विजय मिळवला तर, मुंबई इंडियन्स संघ १० गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मागे टाकत तिसरे स्थान गाठू शकतो.
दोन्ही संघांची अशी असू शकते संभावित प्लेइंग इलेव्हेन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नॅथन कूल्टर नाइल/जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक ), रवींद्र जडेजा, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी आणि दीपक चाहर.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीसाठी खेळताना ‘या’ युवा खेळाडूने जिंकला विराटचा विश्वास, भविष्यात पंत-किशनला देईल टक्कर
बुमराहला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कसोटीत जगापासून का ठेवले होते लपवून, शास्त्रींनी केला खुलासा