टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये लवकरच बदल दिसू शकतात. सध्या राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र बीसीसीआयनं नवीन प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग हे भारताचे नवे प्रशिक्षक बनू शकतात. फ्लेमिंग आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या पदासाठी कधी अर्ज करतात, याची बीसीसीआयचे अधिकारी वाट पाहत आहेत. बीसीसीआयच्या अटींनुसार नवीन प्रशिक्षकाला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची जबाबदारी सांभाळावी लागेल.
बीसीसीआयनं भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज घेणं सुरू केलं असून 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे. सूत्रांनुसार, 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक असलेले स्टीफन फ्लेमिंग हे नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. असं झालं तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची दशादिशा बदलण्याची शक्यता आहे.
स्टीफन फ्लेमिंगकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य असून त्यांना सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घ्यायची, हे माहीत आहे. आयपीएलमधील सीएसकेचे प्रशिक्षक म्हणून त्यांच्या यशाच्या टक्केवारीमुळे त्यांच्याकडे टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक म्हणून पाहिलं जात आहे.
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविड यांनी बीसीसीआयकडे मागणी केली होती की, त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. यानंतर बीसीसीआनं नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच सांगितलं होतं की, जर राहुल द्रविड यांन भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर राहायचं असेल तर त्यांना पुन्हा अर्ज प्रक्रियेतून जावं लागेल. संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी द्रविड यांना किमान कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी राहावं, अशी मागणी केली होती. अशा परिस्थितीत बीसीसीआयला कसोटी आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वेगळे प्रशिक्षक द्यावे लागतील.
टीम इंडियाचा जो कोणी नवीन प्रशिक्षक असेल, त्याचा कार्यकाळ 1 जुलैपासून सुरू होऊन 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. याचा अर्थ नवीन प्रशिक्षक 2027 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकापर्यंत भारतीय संघाची जबाबदारी सांभाळतील.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, तिकीट कसं खरेदी करायचं जाणून घ्या
“एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये असं काय केलंय?”, गौतम गंभीर बरसला; जाणून घ्या काय आहे प्रकरण
18 मे शी विराट कोहलीचं जुनं नातं, या दिवशी चेन्नईचा बँड वाजणार हे निश्चित!