रविवारी (दि. 28 मे) पार पडणारा आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी खेळला गेला, परंतु निकाल लागण्यासाठी मंगळवारची वाट पाहावी लागली. हे सर्व पावसाच्या व्यत्ययामुळे घडले. अखेर गुजरात टायटन्स संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत पाचव्यांदा ट्रॉफी नावावर केली. चेन्नईकडून या हंगामात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मात्र, सर्वाधिक वाहवा अजिंक्य रहाणे याने मिळवली.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या कामगिरीसाठी त्याचे सीएसके (CSK) संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (CSK Head Coach Stephen Fleming) यांनी तोंडभरून कौतुक केले. स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी अनुभवी फलंदाज रहाणेच्या वेगळ्या अंदाजात खेळण्याबाबत बोलताना म्हटले की, त्याने चांगले प्रदर्शन केले. कारण, सीएसकेने त्याच्यावरून ओझे काढून टाकले आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत फ्लेमिंग म्हणाले की, “मला वाटते की, त्याच्यावरून हा दवाब हटला आहे की, तू इतक्याच षटकापर्यंत फलंदाजी करायची किंवा तुला शेवटपर्यंत टिकण्याची गरज आहे. यामुळे रहाणेवरील भरपूर दबाव हटला आहे. जर असे झाले नसते, तर त्याला त्याचा नैसर्गिक खेळ दाखवण्याची संधी मिळाली नसती. जेव्हा त्याच्यावरून हा टॅग हटला, तेव्हा मी एक व्यक्ती पाहिला, जो शानदार फॉर्ममध्ये होता.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “तो आमच्या सुरुवातीच्या योजनेचा भाग नव्हता. मात्र, मुंबईमध्ये त्याला शानदार प्रदर्शन करताना पाहिले होते. ही स्पर्धा आमच्यासाठी सर्वोत्तम विजयांपैकी एक होती आणि तो याचा हिरो होता. त्यामुळे त्याने तिसरे स्थान मजबूत केले. तो पूर्णपणे सकारात्मक राहिला. जेव्हाही सीमारेषेवर झेलबाद व्हायचा किंवा मोठा शॉट खेळायचा, तेव्हा आम्ही फक्त ही पुष्टी करायचो की, तो किती चांगला खेळत आहे. त्यामुळे थोडा विश्वास आणि फक्त क्षमता, तो या वर्षी आमच्यासाठी शानदार खेळाडू राहिला.”
अजिंक्य रहाणेची कामगिरी
अजिंक्य रहाणेने अंतिम सामन्यात 13 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. या हंगामात रहाणे वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने या हंगामात 14 सामने खेळले. यादरम्यान त्याने 32.60च्या सरासरीने आणि 172.48च्या स्ट्राईक रेटने 326 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचाही समावेश होता. (csk head coach stephen fleming explains ajinkya rahanes transformation in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूने विजयी चौकार मारताच चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, चेन्नईच्या मेट्रो स्टेशनमध्येच घातला राडा, Video
आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप, तरीही दिनेश कार्तिकची WTC फायनलमध्ये एन्ट्री, लवकरच होणार इंग्लंडला रवाना