रविवारी (दि. 30 एप्रिल) आयपीएल 2023चा 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स संघात खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे याने आपला शानदार फॉर्म कायम राखला. आतापर्यंत हंगामात चार अर्धशतके ठोकलेल्या कॉनवेने आपली हीच कामगिरी पुढे नेत आणखी एक उत्कृष्ट खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे 86 धावांची सलामी देत योग्य ठरवला. संपूर्ण हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या कॉनवे याने पुन्हा एकदा आपला तोच फॉर्म दाखवला. त्याने 52 चेंडूंचा सामना करताना 92 धावांची खेळी केली. यामध्ये तब्बल 16 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
For his opening brilliance of 92*(52), Devon Conway becomes our 🔝 performer of the first innings of the #CSKvPBKS clash in the #TATAIPL 👌🏻👌🏻
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/6sGVu4w1Wm
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
कॉनवे मागील 6 सामन्यांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतोय. या सहापैकी पाच सामन्यात त्याला अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. त्याने राजस्थानविरुद्ध 50, आरसीबीविरुद्ध 83, हैदराबादविरुद्ध नाबाद 77 व केकेआरविरुद्ध 56 धावा त्याने केल्या होत्या. राजस्थानविरुद्ध त्याला केवळ 8 धावा काढता आलेल्या. मात्र त्याने पुन्हा पुनरागमन करत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी साकारली.
यावर्षी कॉनवे याच्या आयपीएल आकडेवारीकडे पाहिल्यास दिसून येते की त्याने कशाप्रकारे गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये खेळताना 59.14 च्या सरासरीने 414 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट देखील 144 पेक्षा जास्त राहिला असून, त्याने आत्तापर्यंत 50 चौकार व 13 षटकार ठोकलेत. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(CSK Opener Devon Conway Another Brisk Fifty Against Punjab Kings In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या ताफ्यात इंग्लंडच्या घातक वेगवान गोलंदाजाची एन्ट्री, बदली खेळाडू म्हणून मिळाली संधी
“आता अक्षरला दिल्लीचा कर्णधार बनवा”, भारतीय दिग्गजाची वॉर्नरच्या नेतृत्वावर नाराजी