भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी 30 डिसेंबर हा दिवस विसरने कठीण आहे. आजच्याच दिवशी बरबोर 9 वर्षांपूर्वी धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीहोती. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी मालिकेदरम्यान धोनीने हा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अशातच शनिवारी (30 डिसेंबर) धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने खास पोस्ट शेअर केली.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) जवळचे मित्र आहेत. दोघांमधील जवळीक वेळोवेळी जगासमोर आली आहे. 2020 मध्ये एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रैनाने देखील मागचा पुढचा विचार न करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनी आणि रैना चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक वर्ष एकत्र खेळले आहेत. धोनीने 9 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हाही रैना त्याच्या सोबत होता.
चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरू 30 डिसेंबर 2014 रोजीचा एक खास फोटो शेअर केला गेला आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरचा हा फोटो आहे. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या धोनीच्या डोळ्यांमध्ये या फोटोत पाणी दिसत आहे. सुरेश रैनासोबतचा हा फोटो पाहून चाहतेही भावूक झाल्याचे दिसते. सीएसकेच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. पोस्टला कॅप्शन दिले गेले आहे की, “हा सेल्फी सर्व गोष्टी सांगून जात आहे”
View this post on Instagram
दरम्यान, ही केवळ पहिली वेळ नाही, जेव्हा धोनीच्या डोळ्यांमध्ये पाणी आपल्याचे दिसले. 2019 वनडे विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदासाठी दावेदार मानला जात होता. पण उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. मार्टिन गप्टिल याने जबरदस्त थ्रो केल्यामुळे धोनी या सामन्यात धावबाद झाला होता. आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवू न शकल्यामुळे धोनी ड्रेसिंग रुममध्ये लहान मुलाप्रमाणे रडला होता, असे त्यावेळचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले होते.
दरम्यान, धोनीच्या कसोटी निवृत्तीला 9 वर्ष पूर्ण झाली असून त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचला होता. त्याने खेललेल्या 90 कसोटी सामन्यांमध्ये 4876 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 38.09 इतकी होती. (CSK shared a special post to mark 9 years of Dhoni’s Test retirement)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकूण ऑस्ट्रेलियाने घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, भारतीय संघात ‘हे’ दोन महत्वपूर्ण बदल
IND vs SA: पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेल्या प्रसिध कृष्णाबद्दल माजी गोलंदाजाचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘तो कसोटी खेळण्याच्या लायक…’