एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स 4 वर्षांनंतर चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये खेळणार आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा सहावा, तर चेन्नईचा दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सोमवारी (3 एप्रिल) या मैदानावर खेळला जाईल. या सामन्यासाठी चाहत्यांसोबतच संघातील खेळाडूही खूपच उत्सुक आहेत. चेन्नईचा कर्णधार धोनी याच्याकडे या सामन्यात एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल.
या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईला गुजरात टायटन्स संघाकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर चेन्नई आता आपल्या घरच्या मैदानावर लखनऊचा सामना करताना दिसेल. तब्बल चार वर्षानंतर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना चेन्नईला विजयच आवश्यक असेल. या सामन्याची प्रतीक्षा सर्व प्रेक्षक मोठ्या आतुरतेने करत आहेत. त्याचवेळी संघाचा कर्णधार धोनी याच्याकडे केवळ आठ धावा करून एका खास यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची संधी असेल.
आयपीएल मधील सर्वात यशस्वी करणाऱ्यांपैकी एक असलेल्या धोनीला 8 धावा करून आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट होता येईल. गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो 14 धावांवर नाबाद राहिला होता. त्याच्या आधी आयपीएलमध्ये हा पराक्रम सहा फलंदाजांनी केला आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर व एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश आहे. धोनी घरच्याच मैदानावर ही कामगिरी करत चाहत्यांना आनंदाची आणखी एक संधी देऊ शकतो.
धोनीच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने 235 सामने खेळताना 4992 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने चेन्नईसह पुणे संघाचे देखील प्रतिनिधित्व केलेले. चेन्नईने त्याच्याच नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
(CSK Skipper MS Dhoni Needed 8 Runs For Complete 5000 IPL Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023बाबत ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ करतील प्लेऑफमध्ये एन्ट्री, RCBची हाकालपट्टी
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल