इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मुंबईला या सामन्यात सुरुवात चांगली मिळाली. मात्र, त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत मुंबईचा अर्धा संघ 80 धावांत कापून काढला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने षटकार चौकार मारून उत्कृष्ट सुरुवात केलेली. मात्र, चेन्नईसाठी खेळणारा मुंबईचा अष्टपैलू तुषार देशपांडे याने त्याचा त्रिफळा उडवला.
https://twitter.com/2Arati/status/1644711274260082688?t=ItGNmQysq8zLlpxXxkO-9g&s=19
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईला या सामन्यात प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी संघाला ताबडतोब सुरुवात दिली. रोहितने तीन चौकार व एक षटकार खेळला होता. मात्र, चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तुषार देशपांडे याने त्याची खेळी संपुष्टात आणली. तुषारने सरळ टाकलेला चेंडू रोहितला समजू शकला नाही व त्याचा त्रिफळा उडाला.
मुंबईच्या फलंदाजीची वाताहात
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर रोहित शर्मा व ईशान किशन यांनी चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघांनी पहिल्या तीन षटकात 30 धावा फटकावल्या. मात्र, चौथ्या षटकापासून मुंबईचे गडी नियमित अंतराने बाद झाले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशन व कॅमेरून ग्रीन हे देखील तंबूत परतले. भरवशाचा सूर्यकुमार यादव केवळ एक धाव करू शकला. त्यानंतर अर्शद खान 2 धावा करु शकला. मुंबईने आपला अर्धा संघ केवळ 78 धावांमध्ये गमावला.
(CSK Tushar Deshpande Clean Bowled Rohit Sharma MIVCSK IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने रोखला परभणी संघाचा विजयीरथ