---Advertisement---

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसरी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघांमध्ये पार पडली. या मोठ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ७ बाद १८८ धावा केल्या होत्या. परंतु या सामन्यात एमएस धोनीच्या चाहत्यांना निराशा हाती लागली आहे.

या सामन्यात,युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून धोनीच्या धुरंधरांना प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले होते. पण १६ व्या षटकात सुरेश रैना ५४ धावांवर धावबाद झाला.

त्यानंतर एमएस धोनीने मैदानात प्रवेश केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीला आयपीएलच्या पहिल्याच डावात काही सुर गवसला नाही. अवघ्या दुसऱ्या चेंडूवर आवेश खान याने त्याची दांडी गुल केली आणि धोनी भोपळा ही न फोडता माघारी परतला.

चेन्नईने उभा केला १८८ धावांचा डोंगर

चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सलामी फलंदाजांना काही सूर गवसला नाही. फाफ डू प्लेसिसही भोपळा ही न फोडता माघारी परतला तर ऋतुराज गायकवाडने अवघ्या ५ धावा केल्या. पण सुरेश रैना याने ताबडतोड ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यासोबतच मोईन अलीने ३६ तर रायुडूने २३ आणि जडेजाने २६ धावांची खेळी केली. यासोबतच करनने शेवटी येऊन ३४ धावांची आक्रमक खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

एमएस धोनीच्या चेन्नई विरुद्ध मैदानात उतरताच ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर ‘मोठा’ विक्रम

‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे दमदार पुनरागमन! पहिल्याच सामन्यात अर्धशतकासह विराट, रोहितची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---