आयपीएलच्या १४ व्या हंगामाला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील अटीतटीच्या सामन्याने सुरुवात झाली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे बलाढ्य संघ आमने-सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवा रिषभ पंत याने पार पाडली. यासोबतच त्याने विश्वविक्रम करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे.
गतवर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरी गाठली होती. पण यंदा श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्वपद युवा रिषभ पंतला देण्यात आले आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रिषभ पंतने आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्व केलेल्या खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्व करणारा ५ वा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तो २२ वर्षे १८७ दिवस इतके वय असताना पहिल्यांदा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये खेळला होता. त्याच्या पाठोपाठ स्टिव्ह स्मिख, सुरेश रैना आणि श्रेयस अय्यर आहे. आता या यादीत पाचव्या क्रमांकावर रिषभचा समावेश झाला आहे.
संघातील अनुभवी खेळाडूंना डावलत पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने वनडे मालिकेतून आणि आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता की,दिल्ली संघाची जबाबदारी कोणाला द्यावी.
दिल्ली संघात अजिंक्य रहाणे,स्टीव्ह स्मिथ आणि आर.अश्विन सारखे अनुभवी खेळाडू असताना देखील दिल्ली कॅपिटल्स संघाने ही महत्त्वाची जबाबदारी युवा रिषभ पंत वर सोपवली आहे. तो ही जबाबदारी पुढे कशाप्रकारे पार पाडतो. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्त्व केलेले खेळाडू –
२२ वर्षे १८७ दिवस – विराट कोहली
२२ वर्षे ३४४ दिवस – स्टिव्ह स्मिथ
२३ वर्षे ११२ दिवस – सुरेश रैना
२३ वर्षे १४१ दिवस – श्रेयस अय्यर
२३ वर्षे १८८ दिवस – रिषभ पंत
महत्त्वाच्या बातम्या –
थाला-चिन्नाथाला जोडीचा मैदानावर उतरताच विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारी आयपीएलमधील एकमेव जोडी
आरसीबीविरुद्ध हार्दिक पंड्याने का केली नाही गोलंदाजी? ‘हे’ आहे त्यामागचे कारण
आयपीएलचा लोगो तुझ्यासाठीच बनवला आहे! ‘मिस्टर ३६०’ च्या चौफेर फटकेबाजीवर दिग्गज फलंदाज फिदा