गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाचे सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने धुळीस मिळवले. चेन्नईने अंतिम सामन्यात सोमवारी (दि. 29 मे) डावाच्या अखेरच्या चेंडूवर दणदणीत विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. या विजयात रवींद्र जडेजा याचा सिंहाचा वाटा राहिला. जडेजानेच विजयी चौकार मारत संघाला चॅम्पियन बनवले. या विजयानंतर रवींद्र जडेजा भावूक झाला. त्याने धोनीविषयी खूपच मोठे भाष्य केले. आता त्याची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे.
रवींद्र जडेजाची कमाल
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या डावाच्या अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 13 धावांची गरज होती. हे षटक गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून मोहित शर्मा (Mohit Sharma) टाकत होता. या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर 10 धावांची गरज होती. यावेळी पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सरळ बॅटने षटकार मारला. तसेच, लाखो चाहत्यांची उत्सुकता वाढवली. तसेच, अखेरच्या चेंडूवर मागील दिशेने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला आणि चाहत्यांनाही खुश केले.
सामन्यानंतर जडेजाचे भावूक वक्तव्य
सामना जिंकल्यानंतर जडेजा म्हणाला की, “आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर आपला पाचवा किताब जिंकून चांगले वाटत आहे. मी गुजरातचा आहे आणि ही एक खास भावना आहे. ही गर्दी खूपच अद्भूत राहिली आहे. ते रात्री उशिरापर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, मी सीएसकेच्या चाहत्यांना खूप शुभेच्छा देऊ इच्छितो की, जे आमचे समर्थन करण्यासाठी आले.”
???????????? ???????? ???????????? ????????????????????! ????????
Hear from the Man of the Moment – Ravindra Jadeja, who dedicates the win to none other than MS Dhoni ????#TATAIPL | #Final | #CSKvGT | @imjadeja | @msdhoni pic.twitter.com/PLFBsXeLva
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
‘हा विजय धोनीला समर्पित’
पुढे बोलताना जडेजाने एमएस धोनी (MS Dhoni) याच्याविषयी वक्तव्य केले. तो म्हणाला की, “मी हा विजय सीएसके संघाचा एक विशेष सदस्य एमएस धोनीला समर्पित करू इच्छितो. मी फक्त हाच विचार करत होतो की, मला जितके शक्य होईल, तितक्या जोरात स्विंग करण्याची गरज आहे. चेंडू कुठे जाईल, मी याबाबत विचार करत नव्हतो. फक्त जोरात स्विंग करण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वत:ला मागे सारत होतो आणि सरळ मारण्याचा प्रयत्न करत होतो. कारण, मला माहिती आहे की, मोहित संथ गतीने चेंडू फेकू शकतो.”
चेन्नईचा दणदणीत विजय
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या होत्या. तसेच, दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला पावसाने व्यत्यय आणला. यावेळी पावसामुळे चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे आव्हान मिळाले होते. हे कठीण आव्हानही चेन्नईच्या खेळाडूंनी यशस्वीरीत्या पार करून दाखवले. चेन्नईसाठी डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त शिवम दुबे (32), अजिंक्य रहाणे (27), ऋतुराज गायकवाड (26), अखेरचा आयपीएल सामना खेळत असलेला अंबाती रायुडू (19) आणि रवींद्र जडेजा (15) यांनी दोन आकडी धावसंख्या करत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (csk vs gt ipl 2023 final sir ravindra jadeja became emotional after hitting the winning shot said a heart touching thing )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘एकच वादा धोनी दादा, गुजरातला घरात घुसून…’, धोनीच्या CSKने ट्रॉफी जिंकताच केदार जाधव भलताच खुश
अखेर धोनीने IPL निवृत्तीवर मौन सोडलेच; 142 कोटी भारतीयांना अपेक्षित होतं, तेच बोलला ‘माही’, लगेच पाहा