रविवारी (२७ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे आयपीएल २०२२ चा (IPL 2022) पहिला सामना (IPL 2022 First Match) पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघ ५ बाद १३१ धावा करू शकला. सीएसकेचे १३२ धावांचे आव्हान केकेआरने १८.३ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर पूर्ण केले आणि ६ विकेट्स राखून सामना जिंकला. नवा कर्णधार रविंद्र जडेजा याच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेला उद्घाटन सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. सीएसकेच्या केकेआरविरुद्धच्या पराभवास काही गोष्टी जबाबदार ठरल्या(5 Reasons Behind CSK Defeat Against KKR). त्यांचाच या बातमीत आढावा घेण्यात आला आहे.
सीएसकेच्या पराभवामागील ५ कारणे खालीलप्रमाणे आहेत-
खराब सुरुवात-
सीएसकेला या सामन्यात चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. संघाला दमदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे यांच्यावर होती. मात्र ऋतुराज ४ चेंडू खेळून उमेश यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर कॉन्वे ८ चेंडू खेळत उमेश यादवचा शिकार ठरला. त्याने केवळ ३ धावांवर आपली विकेट गमावली.
संथ खेळी-
सीएसकेच्या खराब सुरुवातीनंतर कर्णधार रविंद्र जडेजा आणि एमएस धोनी यांनी पुढे संघाचा डाव सावरला. मात्र त्यांनी अतिशय संथ गतीने खेळी केल्या. जडेजा आणि धोनीमध्ये ५५ चेंडूंमध्ये ७२ धावांची भागीदारी झाली. परंतु टी२० क्रिकेटच्या हिशोबाने त्यांच्या या भागीदारीचा वेग कमी होता.
दिपक चाहरची अनुपस्थिती भोवली-
सीएसकेचा हुकुमी एक्का आणि पावरप्लेमध्ये विकेट्स काढण्यात माहिर असलेला दिपक चाहर या सामन्यात अनुपलब्ध होता. दुखापतीमुळे तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असून पुनर्वसनातून जात आहे. त्यामुळे त्याच्याजागी शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली होती. परंतु दुबेला सामन्यादरम्यान १ षटक गोलंदाजी करताना ११ धावा देत एकही विकेट घेता आली नव्हती. जर सीएसकेने पावरप्लेमध्ये विकेट्स घेतल्या असत्या, तर सामन्याची स्थिती वेगळी असती.
केकेआरची दमदार सुरुवात-
केकेआरची फलंदाजीही सीएसकेच्या पराभवाचे कारण ठरली. केकेआरकडून सलामीला अजिंक्य रहाणेने शानदार खेळी केली. त्याने ऍडम मिल्ने आणि तुषार देशपांडे यांसारख्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करताना ४४ धावा चोपल्या. तसेच रहाणे आणि सलामीवीर वेंकटेश अय्यर यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची तगडी भागीदारीही झाली होती, जी संघासाठी उपयुक्त ठरली.
सॅम बिलिंग्जने सीएसकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास-
केकेआरचा अष्टपैलू सॅम बिलिंग्ज यांने संघाचा विश्वास सार्थी लावला. ८७ धावांवर ३ विकेट्स गेल्या असताना बिलिंग्जने संघासाठी उपयुक्त खेळी खेळत सामना पालटला. त्याने २२ चेंडूंमध्ये २५ धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. शेवटी कर्णधार श्रेयस अय्यरने संघाला विजय मिळवून देण्याचे काम केले.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या ‘या’ कट्टर चाहत्याचे नाही तोड, फ्रँचायझीप्रती प्रेम व्यक्त करताना केले असे काही
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण