fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अशी आहे हरभजन सिंगची विश्वचषक २०१९साठी १५ सदस्यीय टीम इंडिया

मुंबई | जसाजसा विश्वचषक जवळ येत आहे तशी माजी खेळाडूंनी त्यांची संभाव्य टीम इंडिया घोषीत करायला सुरुवात केली आहे. यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग देखील मागे नाही.

भज्जीने सांगितलेल्या १५ सदस्यीय संघात अपेक्षेप्रमाणे जवळपास सर्वच खेळाडू आहेत. परंतु एक- दोन खेळाडूंची नावे नक्कीच वेगळी आहेत.

सलामीवीर म्हणून भज्जीने रोहित शर्मा आणि शिखर धवनलाच पसंती दिली आहे. तर चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत असलेल्या अंबाती रायडूलाच भज्जीने त्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे. न्यूझीलंडमधील विजयी खेळीमुळेच भज्जीने त्याला त्याच्या संघात स्थान दिले आहे.

रविंद्र जडेजा मात्र भज्जीने आपल्या संघात स्थान न देता विजय शंकरचा त्याच्या जागी समावेश केला आहे.

विजय शंकरबरोबर गोलंदाजीत आश्चर्यकारकरित्या उमेश यादवचा संघातील वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात त्याने समावेश केला आहे.

रिषभ पंतला मात्र या संघात भज्जीने संधी दिली नाही.

Photo Courtesy: Twitter/ ICC

विश्वचषक २०१९ला ३०मे रोजी सुरुवात होणार आहे तर टीम इंडिया आपला पहिला सामना ५जून रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत खेळणार आहे. २० एप्रिल ही संघाची अंतिम खेळाडूंची यादी आयसीसीला पाठविण्याची शेवटची तारिख आहे.

२०१९ विश्वचषकासाठी भज्जीचा १५ सदस्यीय भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायडू, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक,उमेश यादव आणि विजय शंकर. स्टॅंड बाय- रविंद्र जडेजा

महत्त्वाच्या बातम्या- 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय

अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली

मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने

असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ

हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा

You might also like