अफगाणिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत मोठा उलटफेर केला. रविवारी (दि. 15 ऑक्टोबर) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. हा अफगाणिस्तानचा विश्वचषक इतिहासात 2015नंतरचा दुसरा, तर इंग्लंडविरुद्धचा पहिलाच विजय ठरला. त्यामुळे हा ऐतिहासिक विजय ठरला. या सामन्यानंतर अफगाणिस्तान संघाचा प्रमुख गोलंदाज राशिद खान याने पाठिंब्यासाठी दिल्लीतील चाहत्यांना खास अंदाजात धन्यवाद दिला.
हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 284 धावा केल्या होत्या. यामध्ये रहमानुल्लाह गुरबाजच्या 86 आणि इकराम अलिखिलच्या 58 धावांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणी फिरकीपटूंपुढे गुडघे टेकले. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी मिळून 8 विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंड संघ 40.3 षटकात 215 धावांवर सर्वबाद झाला.
विश्वचषकाचा हा सामना दिल्लीत पार पडूनही येथील चाहत्यांनी अफगाणिस्तान संघाला जबरदस्त पाठिंबा दिला. तसेच, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. तसेच, विजयाचा आनंद असा काही साजरा केला, जसे भारतीय संघानेच इंग्लंडला पराभूत केले आहे.
दिल्लीच्या चाहत्यांचे हे प्रेम पाहून राशिद खान हादेखील फिदा झाला. त्याने एक खास ट्वीट (एक्स) करत लिहिले की, “दिल्ली सच में दिल वालों की है.” म्हणजेच, दिल्ली खरोखर मन असलेल्यांची आहे. त्याने ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “स्टेडिअममध्ये उपस्थित सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि संपूर्ण सामन्यादरम्यान आम्हाला पुढे नेले. जगभरातील आमच्या सर्व समर्थकांनाही त्यांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.”
Delhi sach mein dil walon ki hai 🙌
A huge thank you to all the fans at the stadium who supported us and kept us going through out the game 🙏
And to all our supporters around the 🌍 thank you for your love 💙
— Rashid Khan (@rashidkhan_19) October 16, 2023
राशिदची कमाल
राशिद खान हा 25 वर्षांचा आहे. त्याने फलंदाजी करताना 23 धावांची महत्त्वपूर्ण खेळीही साकारली. दुसरीकडे, गोलंदाजी करताना त्याने 9.3 षटके टाकत फक्त 37 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. अफगाणिस्तान संघासाठी हा विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. तत्पूर्वी त्यांनी 2015मध्ये स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवलेला. (cwc 2023 afghanistan star cricketer rashid khan expresses gratitude to fans for showing huge support to eng vs afg in delhi)
हेही वाचा-
वर्ल्डकप असो किंवा इतर स्पर्धा, बुमराह घेत नाही कसलाच दबाव; स्वत:च केला मोठा खुलासा
श्रीलंकेच्या सलामीवारांचा भन्नाट विक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, वाचाच