बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय ऍथलेटीक्समध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ट्रिपल जंपमध्ये राष्ट्रकुल इतिहासात भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या एल्डोस पॉलने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी भारतीय खेळाडू अब्दुल्ला अबूबाकरने रौप्यपदकावर कब्जा केला. आणखी एक भारतीय खेळाडू प्रवीणचे कांस्यपदक हुकले. तो चौथ्या क्रमांकावर होता.
#IND's🇮🇳 Eldhose Paul wins GOLD 🥇 & Abdulla Aboobacker Narangolintevid bags SILVER 🥈 in men's Triple Jump event!#TeamIndia | #Cheer4India | #B2022 | #CWG2022 pic.twitter.com/MR8Px7DLQ9
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 7, 2022
पॉलने १७.०३ मीटर उडी मारून पहिले स्थान मिळविले. त्याचवेळी, भारताचा दुसरा ऍथलिट अब्दुल्ला अबूबाकर अवघ्या ०.१ सेमीच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अब्दुल्लाने १७.०२ मीटर उडी मारली.
पॉलने पहिल्याच प्रयत्नात केवळ १४.६२ मीटर उडी मारली होती. यानंतर पुढच्या प्रयत्नात त्याने १६.३० मीटर अंतर गाठले. यानंतर पॉलने १७.०३ मीटर उडी मारून सर्वांना आश्चर्यचकित केले.
अब्दुल्ला अबूबाकरबद्दल सांगायचे तर, त्याने चौथ्या प्रयत्नापर्यंत केवळ १६.७० मीटर उडी मारलेली. परंतु पाचव्या प्रयत्नात या खेळाडूने १७.०२ मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला. अशा प्रकारे अब्दुल्लाने रौप्य पदक जिंकले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ट्रिपल जंपमध्ये भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाले. तर भारताने केवळ दुसऱ्यांदा रौप्यपदक जिंकले आहे. मोहिंदर सिंग गिलने १९७० मध्ये पहिल्यांदा कांस्यपदक जिंकले होते. यानंतर १९७४ मध्ये मोहिंदर सिंग गिलला रौप्य पदक मिळालेले. २०१० मध्ये रणजीत माहेश्वरी आणि २०१४ मध्ये अरपिंदर सिंगने कांस्यपदक जिंकले होते. आता पॉलने सुवर्ण आणि अब्दुल्लाने रौप्य जिंकून इतिहास रचला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG BREAKING: ट्रिपल जंपमध्ये ‘पॉल-अब्दुल्ला’ने रचला इतिहास! गोल्ड-सिल्वर भारताच्याच नावे
तुमसे ना हो पाएगा! दीपक हुड्डाच्या ‘फ्लॉप शो’मुळे भडकले फॅन्स, घेतला चांगलाच समाचार
खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?