इंडियन प्रीमियर लीगच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे पंधराव्या हंगामातील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. हैदराबाद संघाने २ पराभवांसह त्यांच्या हंगामाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी काही सामन्यांमध्ये शानदार खेळ दाखवला. परंतु हंगामाखेर १४ पैकी ६ सामने जिंकत संघ गुणतालिकेत खालून तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र हैदराबाद संघाकडून वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने प्रभावी प्रदर्शन केले आणि भारतीय संघात जागाही मिळवली.
आता हैदराबाद संघाचा (Sunrisers Hyderabad) गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन (Dale Steyn) याने मलिकसोबतचा आपला पहिला अनुभव सांगितला आहे. तसेच मेगा लिलावावेळी (Mega Auction) हैदराबादच्या संघ व्यवस्थापकांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली असल्याचाही स्टेनने खुलासा (Closed Door Discussion) केला आहे.
बंद खोलीत काय झाले बोलणे?
स्टेनने क्रिकेट डॉट कॉम वेबसाईटशी बोलताना म्हटले की, “हैदराबाद संघाच्या संघ व्यवस्थापकांमध्ये लिलावापूर्वी मलिकबद्दल चर्चा झाल्या होत्या. त्यावेळी मीही या चर्चेचा भाग होतो. आम्ही फक्त हे निश्चित करू इच्छित होतो की, संघात अनुभवाची कमी नसावी. कारण उमरान अद्भुत खेळाडू होता आणि त्याच्यातील प्रतिभेबद्दल कसलेही प्रश्न नव्हते. तो खूप वेगाने गोलंदाजी करत होता. अशात त्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या अनुभवी गोलंदाजाची गरज होती. म्हणून संघात भुवनेश्वर कुमार किंवा टी नटराजन यांचे असणे त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण होते.”
काय होती मलिकसोबतच्या पहिल्या भेटीनंतरची प्रतिक्रिया
पहिल्यांदा मलिकला भेटल्यानंतर स्टेनची प्रतिक्रिया काय होती? याबाबत बोलताना स्टेन म्हणाला की, “मी मलिकच्या गतीला पाहून चकित झालो होतो. मी त्याला पदार्पण करताना पाहिले होते. मी तेव्हा समालोचन करत होतो. मी त्याला गोलंदाजी करताना पाहिले आणि त्याच्या वेगाने मला चकित केले. तो सातत्याने एकाच वेगाने गोलंदाजी करत होता. त्याला टीव्हीवर गोलंदाजी करताना पाहणे ते प्रत्यक्षात गोलंदाजी करताना पाहणे, हा अनुभव फार वेगळा होता.”
“मलिकला पहिल्यांदा भेटणे आणि त्याच्या शारिरीक संरचनेला पाहणे व एक व्यक्ती म्हणून त्याच्या मजेदार चरित्राला समझून घेणे खरोखरच खूप रोमांचक होते. तो खेळाप्रती खूप समर्पक आहे. त्याला सतत काही ना काही शिकत राहायचे आहे. एक प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या रूपात एका खेळाडूकडून अजून तुम्हाला यापेक्षा जास्त अपेक्षा नसतात,” असे शेवटी स्टेनने म्हटले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘नशीबवान आहोत, की आमच्याकडे तो आहे’, सॅमसनने गायले ‘या’ खेळाडूचे गुणगान
सामना हरला, पण मनं जिंकली! विराटने केले असं काही की होतंय सर्वत्र कौतुक; पाहा Video
तब्बल १०९ वर्षापासून ‘या’ गोलंदाजाचा विक्रम आहे अबाधित; एका दिवसात घेतलेल्या दोन हॅट्रिक