दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने भारताच्या मोहम्मद शमीला सध्याचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हटले आहे. स्टेनने ट्विटरवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शमी हा सध्या जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, असे म्हटले आहे.
स्टेनला ट्विटरवर एका चाहत्याने विचारले होते की ‘तूझ्यानुसार सध्याचा कोणता गोलंदाज सर्वोत्कृष्ट आहे.’ या प्रश्नाचे उत्तर देताना स्टेनने शमीचे नाव घेतले आहे. स्टेन म्हणाला, ‘सध्याच्या फॉर्मनुसार शमी.’
According you to best bowler now?
— Drishti (@drishti_raina3) November 16, 2019
Shami on current form
— Dale Steyn (@DaleSteyn62) November 16, 2019
नोव्हेंबर 2017 पासून शमी कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने नोव्हेंबर 2017पासून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 17 च्या सरासरीने 51 विकेटस घेतल्या आहेत.
शमीने नुकत्याच भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आयसीसीच्या गोलंदाजांच्या सध्याच्या कसोटी क्रमवारीत शमीने आठ स्थानांची झेप घेत 7 वे स्थान मिळवले आहे.
एटीपी फायनल्स जिंकणारा स्टीफनोस सित्सिपास ग्रीसचा पहिला टेनिसपटू! https://t.co/NOYA0S86Bm#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Tennis #NittoATPFinals #StefanosTsitsipas
— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019
आता जगाने ऑस्ट्रेलियाचे नाही तर भारतीय क्रिकेटचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे
वाचा- https://t.co/2la4VS0Fnk #म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019






