भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान त्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिसेबनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यासाठी (14 डिसेंबर) रोजी भिडणार आहेत. 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पण गाबा कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंगने (Damien Fleming) मोठा दावा केला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान जखमी झाला होता. मात्र, फिजिओकडून उपचार घेतल्यानंतर त्याने काही गोलंदाजी केली. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने (Morne Morkel) बुमराहला तंदुरुस्त घोषित करत सांगितले होते की, “त्याच्या पाठीत फक्त दुखापत झाली आहे, जी आता पूर्णपणे ठीक आहे.”
मात्र, दुसऱ्या कसोटीनंतर एक दिवसही सरावाला उपस्थित न राहिल्याने बुमराहच्या दुखापतीची बातमी अधिक तीव्र झाली. आता तर प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) दुखापत लपवत असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, बुमराहने गेल्या आठवड्यात एकाही दिवशी नेटमध्ये गोलंदाजी केली नाही.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंगने (Damien Fleming) सेन रेडिओशी संवाद साधताना सांगितले की, “जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत काही गंभीर शंका आहेत. ॲडलेडमध्ये दुसऱ्या डावात बुमराहने षटक का टाकले याचे मला आश्चर्य वाटते. आता सिराजवरील कामाचा ताण वाढू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबने लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूची विस्फोटक खेळी, संघाला पोहोचवलं सेमीफायनलमध्ये
अजिंक्य रहाणे-पृथ्वी शॉची धमाल फलंदाजी, मुंबईचा संघ विजेतेपदापासून केवळ दोन पावलं दूर
IND vs AUS; भारतासाठी तिसरा सामना जिंकणे अवघड? गाबाच्या खेळपट्टीबाबत क्युरेटरचा मोठा खुलासा






