अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या जबरदस्त विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे. इरफान पठाणच्या या डान्सवर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचवेळी इरफान पठाणनेही आपल्या डान्सवर झालेल्या टीकेनंतर पाकिस्तानचा समाचार घेतला आहे.
खरं तर, चेन्नईमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा इरफान पठाण (Irfan Pathan) याने अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खानसोबत कॉमेंट्री करताना डान्स केला होता. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इरफान पठाणवर पाकिस्तानमध्ये बरीच टीका झाली होती. इरफान पठाणबाबत पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला तेव्हाही इरफान पठाण नाचताना दिसला. स्टुडिओमध्ये त्याने हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्यासोबत डान्स केला.
इरफान पठाणच्या डान्सचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावर इरफान पठाणवर बरीच टीका झाली. याबाबत इरफान पठाण याने एक ट्विट केले आहे. ज्यात त्यानी इशाऱ्यात पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. इरफान पठाण म्हणाला, “डांस असा करायचा की…”.
Dance esa karo ke….
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 31, 2023
विश्वचषक 2023 मधील पुणे येथे झालेल्या 30 व्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 विकेट्ने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 49.3 षटकांत 241 धावा करत सर्वबाद झाला. अफगाणिस्तानने 45.2 षटकांत केवळ 3 विकेट्स गमावून हे लक्ष्य सहज गाठले. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत रहमत शाह, कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी अर्धशतके झळकावली. या विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत जाण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. (Dance should be done like after Afghanistan victory Irfan once again criticized Pakistan)
म्हत्वाच्या बातम्या
‘येत्या पाच वर्षात…’, अफगाणिस्तान संघाबाबत पाकिस्तानी क्रिकेटपटूची धक्कादायक भविष्यवाणी