दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार डेन वॅन निकर्क हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या निकर्क भारतात सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळत आहे. निकर्कच्या निवृत्तीची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होती, पण गुरुवारी (16 मार्च) संध्याकाली तिच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली गेली. दक्षिण आफ्रिका क्रिकेटने याविषयी माहिती दिली.
मागच्या महिण्यात दक्षिण आफ्रिका संघाने टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवले. मायदेशात खेळल्या गेलल्या या महत्वाच्या स्पर्धेत डेन वॅन निकर्क (Dane van Niekerk) हिला मात्र संधी दिली गेली नाही. निकर्कला संघातून वगळल्यामुळे संघ व्यवस्थापनावर प्रश्न देखील उपस्थित केले गेले. तर दुसरीकडे ही दिग्गज खेलाडू नाराज असल्याचे पाहायला मिळाले. निकर्कच्या अनुपस्थितीत सुने लूस (Sune Luus) हिने दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडली आणि संघाला उपांत्या सामन्यापर्यंत घेऊन गेली. पण उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला मात देत अंतिम सामना गाठला. नंतर दक्षिण आफ्रिका संघाची नियमित कर्णधार म्हणून लूसची नियुक्ती केली गेली.
https://www.instagram.com/p/Cp2jiC7I2Og/?utm_source=ig_web_copy_link
निकर्कने तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर दुखापतीच्या कारणास्तव ती संघातून बाहेर राहिली. यावर्षी जानेवारी महिन्यात मायदेशातील तिरंगी लढतीत निकर्क संघात पुनरागमन करेल, असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. माहितीनुसार निकर्कला चाचणी पार करता आली नसल्याने ती पुनरागमन करू शकली नाही आणि नंतर टी-20 विश्वचषकातून देखील तिचे नाव वगळण्यात आले.
निकर्कच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर तिने आपल्या संघासाठी एक कसोटी, 107 वनडे आणि 86 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये तिने अनुक्रमे 22, 2175, 1877 अशा धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये 1, 138 आणि 65 विकेट्स तिने या तिन्ही फॉरमॅटमध्ये घेतल्या आहेत.
(Dane van Niekerk announced his retirement from international cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जीवघेण्या कॅन्सरला मात देणाऱ्या युवराजने घेतली रिषभची भेट, विस्फोटक पंतला हिम्मत देत म्हणाला…
स्टेडिअममध्ये पाय ठेवायला नव्हती जागा, कट्टर क्रिकेटप्रेमी चढले झाडावर, ‘या’ क्रिकेट सामन्याला तुफान गर्दी






