हॉकी हा खेळ खेळभावनेने विरोधी संघातील खेळाडूंचा आदर करत खेळण्याचा खेळ आहे. या खेळात अनेकदा डोळे दिपवणारे प्रसंग पाहायला मिळत असतात. मात्र, यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये झालेल्या एका हॉकी सामन्यात खेळाला शरमेने लाजवणारी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. सुरू असलेल्या हॉकीच्या सामन्यात थेट कुस्तीची लढत रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.
कॅनडा आणि इंग्लंडचे पुरुष संघ पूल-बीच्या सामन्यात आमनेसामने आले. थेट सामन्यादरम्यान इंग्लंड आणि कॅनडाच्या दोन खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. एकाने त्याचा गळा पकडला तर दुसऱ्याने त्याची कॉलर पकडली. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सहकारी खेळाडू आणि रेफ्री यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर हे प्रकरण कसेबसे मिटले.
????
Wrong hockey sport Panesar!
Completely let down @FieldHockeyCan with that one. #cwg2022 | #Birmingham22 | #hockey pic.twitter.com/7OyYv6ZUDr— Hockey World News (@hockeyWrldNws) August 4, 2022
इंग्लंडचा ख्रिस ग्रिफिथ आणि कॅनडाचा बलराज पानेसर हे दोन खेळाडू हॉकी सामन्यात लढले. मैदानावर अशी वागणूक दाखवल्याबद्दल पनेसरला रेफ्रींनी लाल कार्ड दाखवले, तर ग्रिफिथवरही कारवाई करून त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. हा सामना इंग्लंडने जिंकला. त्यांनी कॅनडाचा ११-२ असा पराभव केला. मात्र, एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवूनही यजमान देशाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. अंतिम-4 मध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडला कॅनडाविरुद्धचा सामना १५ गोलच्या फरकाने जिंकावा लागला. इंग्लंडचा हॉकी संघ असे करण्यात यशस्वी झाला असता तर भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरला असता आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना केला असता.
दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी त्यांच्या शेवटच्या पूल ब सामन्यात वेल्सचा ४-१ असा पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत सिंगने तीन गोल केले. भारतीय संघ सलग चौथ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पुरुष हॉकी संघाने कधीही सुवर्णपदक जिंकलेले नाही. यावेळी मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताला सुवर्णपदक जिंकण्याची चांगली संधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बडे मिया.. छोटे मिया सुभानल्ला! मिचेल स्टार्कच्या भावाने कॉमनवेल्थमध्ये जिंकले सिल्वर मेडल
कसलं भारी ना! दिनेश कार्तिकच्या पत्नीशी कांस्य पदक विजेत्या सौरव घोषालचे आहे जवळचे नाते






