इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये प्रत्येक वर्षी काही युवा खेळाडू स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत असतात, तर दिग्गजांना देखील स्वतःला सिद्ध करावे लागते. चालू आयपीएल हंगामाच्या लीग स्टेजचे जवळपास अर्धे सामने खेळले गेले आहेत. अशात यावर्षी देखील काही नवीन चेहऱ्यांना प्रसिद्धी मिळाली आहे, तर काही दिग्गज मात्र अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. काही दिग्गज खेळाडू मेगा लिलावात कोट्यावधी रुपयांच्या किमतीत विकले गेले, पण त्या रकमेच्या साजेसे प्रदर्शन मात्र करू शकले नाहीत. आपण या लेखात अशाच तीन विदेशी खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे यावर्षी आयपीएलमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत.
आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बीसीसीआयने मेगा लिलावत आयोजित केला होता, ज्यामध्ये अनेक विदेशी खेळाडूंना कोट्यावधी रुपये मिळाले. पण त्यापैकी अनेक विदेशी खेळाडू मिळालेल्या पैशांची परतफेड होईल असा खेळ दाखवू शकले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड, इंग्लंडचा मोईन अली आणि ऑस्ट्रेलियाचा डॅनियल सॅम्स अशा नावांचा सहभाग आहे. चला तर जाणून घेऊया या विदेशी खेळाडूंविषयी.
कायरन पोलार्ड
कायरन पोलार्ड (Kieron Pollard) जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जोतो. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्याने मुंबई फ्रँचायझीला दिलेले योगदान बहुमूल्य आहे आणि या पार्श्वभूमीवर फ्रँचायझीने त्याला चालू हंगामासाठी ६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. परंतु चालू हंगामात अद्याप तो अपेक्षित खेळी करू शकला नाहीये.
आयपीएल २०२२मधील सुरुवातीच्या ६ सामन्यात पोलार्डने ८२ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीत देखील त्याला प्रभाव पाडता आलेला नाहीये. ६ सामन्यात त्याने फक्त १ विकेट घेतली आहे. हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडल्यानंतर अष्टपैलू प्रदर्शनाची जबाबदारी पोलार्डवर येऊन पडली आहे, पण त्याला ती पेलता येत नसल्याचे दिसते. तो धावा आणि विकेट्स मिळवण्यासाठी झगडत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा