आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्याधीश बनले. काही अपरिचित खेळाडूंना या लिलावात चांगली रक्कम मिळाली. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या आधारभूत किमतीत विकत घेतले. त्यानंतर, अनेकांना अर्जुनचे अभिनंदन केले. त्यामध्ये आता इंग्लंडच्या एका महिला क्रिकेटपटूची भर पडली आहे.
इंग्लंडच्या महिला खेळाडूने व्यक्त केला आनंद
आयपीएल लिलाव २०२१ मध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरवर मुंबई इंडियन्सवर २० लाखांची बोली लावली. अर्जुनला बोली लागल्यामुळे इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट खूश झाली. अर्जुन तेंडुलकरने आपल्या निवडीनंतर मुंबई इंडियन्सचे मालक आणि प्रशिक्षक यांचे आभार मानले आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे, ज्यात अर्जुन तेंडुलकर बोलताना दिसत आहेत.
मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटने टिप्पणी करत आनंद व्यक्त करताना लिहिले की, “येस अर्जुन! प्राऊड.” यापूर्वी वॅटने अर्जुनला त्याच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पदार्पणावेळी शुभेच्छा दिल्या होत्या. २०१८ मध्ये तिचे आणि अर्जुनचे डिनर डेटचे छायाचित्र व्हायरल झाले होते.
भारतीय संघाची चाहती आहे डॅनियल वॅट
इंग्लंड संघासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणारी डॅनियल वॅट भारतीय क्रिकेट संघाची मोठी चाहती आहे. भारतीय संघाचा कामगिरीबाबत ती सातत्याने ट्विट करत असते. २०१४ मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रपोज केल्यानंतर ती चर्चेत आली होती. विराटने इंग्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर तिची सदिच्छा भेट घेतली होती. तिने इंग्लंडसाठी ७४ वनडे व १०१ टी२० सामने खेळले आहेत. आयपीएलदरम्यान यूएई येथे झालेल्या वुमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत तिने वेलोसिटी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्वाच्या बातम्या:
शाकिब-भज्जीची अनुभवी फिरकी जोडी केकेआरला जिंकून देणार जेतेपद? पाहा संघातील सर्व खेळाडूंची यादी
आयएसएल २०२०-२१ : कोलकता डर्बी जिंकत एटीके मोहन बागानची आघाडी भक्कम