वनडे विश्वचषक 2023च्या 12व्या सामन्यात पाकिस्तान संघाला भारताकडून 7 विकेट्नसे मात मिळाली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने याने संघासाठी धमाकेदार खेळी करून विजय मिळवला. दुसरीकडे पाकिस्तानसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी केलेल्या धावा संघाला विजय मिळवून देऊ सकल्या नाहीत. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पाकिस्तान संघ विशेषतः मोहम्मद रिझवानवर निशाणा साधला.
दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये जेव्हा दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने आपल्या संघातील खेळाडू आणि संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. यापूर्वी देखील वेळोवेळी त्याने चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात शनिवारी (14 ऑक्टोबर) पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर दानिशने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली की, “पुढच्या वेळी तुमचा विजय माणुसकीसाठी समर्पित करा. या जगात कोणीच कृरतेला समर्थन देत नाही.” दानिशच्या या पोस्टमध्ये कोणाचे नाव जरी नसले, तरी त्याचा निशाणा मोहम्मद रिझवानवर असल्याचे स्पष्ट होते.
Next time dedicate your victory to humanity. The almighty never supports cruelty. #IndvsPak
— Danish Kaneria (@DanishKaneria61) October 15, 2023
मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर दिलेल्या एका विधानाशी संबधित दानिशची पोस्ट असल्याचे समजते. श्रीलंकन संघाविरुद्ध पाकिस्तानने345 धावांचे लक्ष्य गाठत 6 विकेट्सने विजय मिळवला होता. विश्वचषकातील पाकिस्तानचा हा दुसरा सामना असून 10 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये हा विजय पाकिस्तानला मिळाला होता. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने 121 चेंडूत 131 धावांची सर्वोत्तम खेळी केली, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. पाकिस्तनचा हा विजय रिझवानने पॅलेस्टाईनसाठी समर्पित केला होता.
मागच्या एक आठवड्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध पेटले आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने या युद्धाला सुरुवात केली, ज्याचे इस्रायल सरकारकडून देखील तितक्याच ताकदीने उत्तर दिले गेले. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी पोहोचली आहे. जगभरातील देश या युद्धाकडे लक्ष ठेवून आहेत. काही देश इस्रायलचे समर्थन करत आहेत, तर काहींनी पॅलेस्टाईनला उघड पाठिंबा दिल्याचे दिसते. अशात भारतात सुरू असलेल्या विश्वचषकादरम्यान मोहम्मद रिझवानने संघाचा विजय पॅलेस्टानईला समर्पित केल्यामुळे याविषयी वेगवेगळी मते पाहायला मिळत आहेत. (Danish Kaneria did not like Mohammed Rizavan’s support for Palestine)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाला सावरण्यासाठी येणार संकटमोचक! ‘या’ दिवशी भारताकडे करणार प्रयाण
‘आता सुरुवात करावी लागेल’, पहिल्या दोन पराभवांनंतर कमिन्सने उचलला विडा, प्रत्येक सामना फायनलप्रमाणे