पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल वक्तव्य केले आहे. जर महेंद्रसिंग धोनीला भविष्यामध्ये समालोचन आणि प्रशिक्षणापैकी कोणती गोष्ट निवडावी लागली, तर तो समालोचनापेक्षा प्रशिक्षणाला जास्त प्राधान्य देईल, असे त्याचे म्हणणे आहे. खरे तर, दानिशला एका यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत विचारण्यात आले होते की, धोनीने आता निवृत्ती घेतली आहे आणि तो आता फुढे काय करेल असे तुला वाटते?
या विचारलेल्या प्रश्नावर दानिशने उत्तर दिले आहे. परंतु त्याने दिलेल्या उत्तरामागचे कारण सांगितले नाही. या प्रश्नावर उत्तर देत दानिश म्हणाला की, “मला वाटत आहे की, धोनी समालोचनापेक्षा प्रशिक्षणाला प्राधान्य देईल. धोनी लवकरच प्रशिक्षणाच्या विश्वात आपले पहिले पाऊल टाकेल आणि या क्षेत्रातून नव्या कारकिर्दीचू सुरूवात करेल असे मला नक्की वाटत आहे. धोनीच्या प्रशिक्षणाचा भारतीय संघातील खेळाडूंना नक्कीच फायदा होईल.”
मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध 2019 मध्ये विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना धोनीसाठी शेवटचा सामना ठरला. परंतु हा सामना भारतीय संघाने गमावला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता धोनी फक्त आयपीएल दरम्यान मैदानावर दिसतो आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यात दिसून आला होता. परंतु बायो बबलमध्ये झालेल्या कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएल 2021 चे सामने स्थगित झाले आहेत. स्थगिती मिळण्यापूर्वी आयपीएलचे 29 सामने झाले होते. आता या हंगामाचे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे निश्चित केले जाणार. आयपीएलच्या सामन्यांना स्थगिती मिळण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळविता आला होता. त्याचबरोबर संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट-सचिनच्या तुलेनवर भडकला पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणे, ‘अशी निरर्थक गोष्ट करणे थांबवा’
Indian Sports Honours: शास्त्रींना कोच ऑफ द ईयरचे मानांकन, रोहितच्याही पारड्यात ‘हा’ सन्मान