---Advertisement---

‘आता नाही तर कधी?’, सरफराजला डावलले जात असल्यामुळे पाकिस्तानी दिग्गजही नाराज

On: सोमवार, जानेवारी 30, 2023 10:56 PM
Sarfaraz-Khan
---Advertisement---

पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दानिश कनेरिया याने भारताचा युवा फलंदाज सरफराज खान याच्याविषयी खास प्रतिक्रिया दिली. सरफराज खान भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला फलंदाज आहे. त्याने या काही वर्षांमध्ये सर्वोत्तम देशांतर्गत प्रदर्शन केले, पण अद्याप भारतीय संघात संधी मिळवू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा माजी दिग्गज दानिश कनेरियाने देखील मत व्यक्त केले.

भारताला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने संघ घोषित केला आहे. दोन सामन्यांसाठी निवडलेल्या भारतीय संघात सरफराज खानला संधी मिळणे अपेक्षित होते, मात्र निवडकर्त्यांनी यावेळीही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. सरफराजऐवजी कसोटी संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला सामील करण्यात आले. निवडकर्त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून आता या यादीत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दानिश कनेरिया (Danish Kaneria) देखील सामील झाला आहे.

सरफराज खानविषयी काय म्हणाला दानिश कनेरिया
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना दानिश म्हणाला, “तुम्ही त्याला (सरफराज) आता संधी देणार नसाल, तर कधी देणार आहात. सरफराज खानपेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये दुसरा कोणता फलंदाज आहे, असे मला नाही वाटत. तुम्ही त्याला आता संधी दिली नाही, तर तो खूप निराश होईल. त्याच्या प्रदर्शनावर सतत लक्ष ठेवले पाहिजे.”

सरफराजनला वारंवार डावलल्यामुळे निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर संघाच्या निवडकर्त्यांकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते की, “सरफराज निश्चितच आमच्या रडारवर आहे. योग्य वेळ आल्यावर त्याला संधी नक्कीच दिली जाईल. जेव्हा संघा निवडण्याची वेळ येते तेव्हा संघाचे समिकरण आणि संतुलन या गोष्टी लक्ष्यात घ्याव्या लागतात.”

दुसरीकडे सरफराज मात्र संधी मिळत नसली, तरी रणजी संघासाठी वादळी खेळी करतच आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणाविषयी विचारले असता सरफराज म्हणाला की, “रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी किंवा विजय हजारे ट्रॉफी या सर्व प्रकारांमध्ये जास्तित जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे. माझ्या हातात असणाऱ्या गोष्टींवर मी लक्ष देत आहे. हातात नसलेल्या गोष्टीवर विचार करून फायदा नाही. त्यामुळे माझे लक्ष नेहमीच जास्त धावा करण्यावर असते.” (Danish Kaneriya expressed his displeasure over Sarfaraz Khan not getting a chance to debut for India)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्पिन बॉलिंग करणार का?’, 150 च्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या फर्ग्युसनला सॅंटनरची विचारणा
‘चहल माझा फलंदाजी प्रशिक्षक आहे…’, सूर्यकुमार यादवचा मजेशीर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---