---Advertisement---

आयडीया! रनआऊट होऊ नये म्हणून डार्सी शॉर्टने केले असे कृत्य की पाहून पोट धरून हसाल – Video

On: रविवार, डिसेंबर 12, 2021 5:08 PM
D'arcy-Short
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही असा प्रकार घडत असतो. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. शनिवारी (११ डिसेंबर) झालेल्या सामन्यात होबार्ट हरिकेंस आणि सिडनी सिक्सर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लागलेल्या या सामन्यात होबार्ट हरिकेंस संघाने सिडनी सिक्सर्स संघाला ४४ धावांनी पराभूत केले. दरम्यान या सामन्यात फलंदाजाने धावबाद होऊन बाद होऊ नये, म्हणून असे काहीतरी कृत्य केले ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

बिग बॅश लीग स्पर्धेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये फलंदाज यष्टीचीत होऊ नये म्हणून आगळी वेगळी शक्कल लढवताना दिसून येत आहे. जे पाहून क्रिकेट चाहत्यांना हसू अनावर झाले होते. यामध्ये दिसते की, फलंदाज क्रीझच्या पुढे आला आहे. त्यामुळे धावबाद होऊ नये म्हणून तो दोन्ही पाय पसरताना दिसून येत आहे. त्याचा एक पाय क्रीझच्या आत आहे. तर दुसरा पाय क्रीझच्या बाहेर आहे. यादरम्यान त्याच्या हातात बॅट देखील नाहीये.

या व्हिडिओला कॅप्शन देत ‘ नमस्ते डार्सी शॉर्ट’ असे लिहिले आहे. या कॅप्शनवर देखील चाहते मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. यापूर्वी एमएस धोनीने देखील अशीच शक्कल लढवली होती.

https://www.instagram.com/p/CXVmumVB2LX/?utm_medium=copy_link

या सामन्यात होबार्ट हरिकेंस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. होबार्ट हुरिकेंस संघाकडून मॅथ्यू वेडने ४६ चेंडुंमध्ये ९३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले. तर डार्सी शॉर्टने ५१ चेंडुंमध्ये ७३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले होते. या खेळीच्या जोरावर होबार्ट हरिकेंस संघाला २० षटक अखेर २ बाद २१३ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना पावसाचे आगमन झाले होते. ज्यामुळे हा सामना १८ षटकांचा करण्यात आला होता. सिडनी सिक्सर्स संघाला विजयासाठी १८ षटकात १९६ धावांची आवश्यकता होती. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्स संघाला १५१ धावा करता आल्या. सिडनी सिक्सर्स संघाकडून जोश फिलिपने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या : 

‘एव्हरयंग’ ताहिर श्रीलंकेत करतोय मन जिंकणार काम; स्वत: केला खुलासा

‘ऍशेसबद्दल काही ट्वीट का नाही केले?’ चाहत्याच्या प्रश्नावर जाफरचं मन जिंकणारं उत्तर

विश्वचषक जिंकून देण्यात युवराजची भूमिका सर्वात महत्त्वाची; पाहा आकडे काय सांगतात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---