भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका एक-एक अशा बरोबरीवर आली. उभय संघांतील दुसरा टी-20 सामना भारताने 16 धावांच्या अंतराने गमावला. कर्णधार दासुन शनाका याने श्रीलंकेसाठी या सामन्यात सर्वाधिक 56 धावांची खेळी केली आणि मॅच विनरची भूमिका पार पाडली. दरम्यान भारताविरुद्धच्या टी-20 सामना दासुन शनाका अशा प्रकारे मॅच विनरच्या भूमिकेत दिसला. भारतात टी-20 सामना खेळताना शनाकाने दुसऱ्यांदा अशी भूमिका पार पाडली आहे.
श्रीलंकन संघाने गुरुवारी मोठ्या काळानंतर भारतात टी-20 सामना जिंकला. सात वर्षांपूर्वी जेव्हा श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा यजमान भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात पराभूत झाला होता. तेव्हाचा सामना देखील पुण्यात खेळला गेला होता आणि गुरुवारचा (5 जानेवारी) देखील पुण्यात पार पडला. या दोन्ही सामन्यांमध्ये दसुन शनाका (Dasun Shanaka) श्रीलंकेसाठी मॅच विनर ठरलेला. सात वर्षांपूर्वी 9 फेब्रुवारी 2016 रोजी पुण्यात खेळताना शनाकाने श्रीलंकन संघासाठी तीन विकेट्स घेतल्या होत्या. यातील एक विकेट धोनीची देखील होती.
या सामन्यात एमएस धोनी भारताचे नेतृत्व करत होता, तर श्रीलंकन संघाचा कर्णधार दिनेश चांदीमल होता. 2016 साली खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघ अवघ्या 101 धावांवर गुंडाळला गेला होता. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने 5 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार दिनेश चंदीमल याने सर्वात जास्त 35 धावा केल्या होत्या.
भारत आणि श्रीलंका यांत्यातील गुरुवाच्या सामन्याचा विचार केला, तर या सामन्यात शनाकाने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 6 षटकार देखील ठोकले. कुसल मेंडिसने श्रीलंकेसाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मेंडिसने 52 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पावरप्लेमध्ये 4 विकेट्स गमावल्या. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. शेवटच्या षटकात शनाकाने अक्षर पटेल आणि नंतर शिवम मावी या दोघांना तंबूत धाडले आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला. शनाकाने केलेल्या अष्टपैलू प्रदर्शनानंतर चाहते त्याचे 7 वर्षांपूर्वीच्या प्रदर्शनाला देखील पुन्हा उजाळा देत आहेत. (Dasun Shanaka shined for the second time in Pune, beating first MS Dhoni and now skipper Hardik Pandya)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUSvSA: भारताचे टेंशन वाढले! सिडनी कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसाने फेरले पाणी
रोहित आणि विराटची टी-20 कारकीर्द समाप्त? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून मिळाले संकेत