भारतात क्रिकेटपटूंच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेणे चाहत्यांना आवडत असते. त्यामुळे अनेकदा भारतीय क्रिकेटपटूंच्या व्यैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर चर्चा होत असते. अशीच एक चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलबद्दल सुरु आहे. त्याचे नाव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारासोबत जोडले जात आहे. मात्र आता स्वत: शुबमननेच त्याच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल खुलासा केला आहे.
काहीदिवसांपूर्वी शुबमनने इंस्टाग्रामवर प्रश्न-उत्तराचे सत्र घेतले होते. यावेळी चाहत्यांकडून त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान एका चाहत्यांने त्याला तो ‘सिंगल’ आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर शुबमनने उत्तर दिले की ‘हो. मी सिंगल आहे. निकटच्या भविष्यातही रिलेशनशीपमध्ये येण्याची योजना नाही.’
सारा आणि शुबमन रिलेशनशीपमध्ये असण्याच्या चर्चा
मागील अनेक दिवसांपासून साराचे नाव शुबमनशी जोडले जात आहे. यामागे अनेक कारणे आहेत. साराने याआधी शुबमनच्या पोस्टवर कमेंट केल्याने या दोघांमधील नात्याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्या दोघांनीही एकाच दिवशी एकच कॅप्शन असलेले आपापले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
तसेच मागीलवर्षी आयपीएल २०२० दरम्यान सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील एक व्हिडिओ ठेवला होता. ज्यात कोलकाताकडून खेळणारा शुबमन क्षेत्ररक्षण करताना दिसत होता. तसेच या व्हिडिओला तिने हार्टच्या इमोजीही ठेवली होती. या पोस्टमुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.
तरी आता स्वत: शुबमननेच तो सिंगल असल्याचे सांगत एकप्रकारे या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी शुबमनची निवड
पुढील महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या एकूण ६ सामन्यांसाठी शुबमनची भारतीय संघात निवड झाली आहे. या इंग्लंड दौऱ्यात शुबमन रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी’ धोनीने केली होती पीटरसनची बोलती बंद, उथप्पाने उलगडला किस्सा
सुशीलआधी ‘या’ सहा ऑलिंपियनने भोगलाय तुरुंगवास; सुवर्णपदक विजेत्यांचाही समावेश
दम लगाके हैशा! रिषभ पंतने ‘या’ व्यक्तीला दाखवला आपला दम; उचलून फिरवले गरगर