भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप खेळत आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर पुजाराने हा निर्णय घेतला होता. तो काउंटी चँपियनशीपमध्ये ससेक्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे, जिथे त्याची बॅट आग ओकत आहे. पुजाराने आतापर्यंत काउंटी चँपियनशीपमध्ये ३ सामने खेळताना २ द्विशतके आणि १ शतक केले आहे. यानंतर पुजाराची एक लहानगी चाहती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पुजारासोब त्याची पत्नी पूजा पुजारा आणि मुलगी (Cheteshwar Pujara Daughter) आदिती यादेखील इंग्लंडमध्ये आहेत. डरहम विरुद्ध ससेक्स संघात झालेल्या सामन्यादरम्यान त्या दोघीही पुजाराला चीयर करण्यासाठी (Daughter Aditi Cheering Cheteshwar Pujara)स्टेडियममध्ये गेल्या होत्या.
डरहम विरुद्ध ससेक्स (Durham Vs Sussex) यांच्यात २८ एप्रिलपासून सामना खेळवला जात होता, ज्याचा निकाल १ मे रोजी लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डरहमने २२३ धावा केल्या होत्या. डरहमच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुजाराने (Cheteshwar Pujara Double Century) द्विशतक ठोकले. ३३४ चेंडू खेळताना त्याने २०३ धावा फटकावल्या. आपल्या या खेळीदरम्यान त्याने २४ चौकारही मारले. त्याच्या या द्विशतकी योगदानामुळे ससेक्सने ५३८ धावा धावफलकावर लावल्या आणि ३१५ धावांची आघाडी घेतली.
पुजाराच्या या शानदार खेळीनंतर त्याची मुलगी आदिती त्याला शुभेच्छा देण्यासाठी मैदानाबाहेर थांबली होती. पुजाराने या गोंडस क्षणाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, पुजारा द्विशतक केल्यानंतर पव्हेलियनला परतत होता. यावेळी त्याची मुलगी आदिती आपल्या वडिलांचा हाय-फाइव्ह देण्यासाठी उभी होती. पुजाराने तिला पाहल्यानंतर तिच्याजवळ जाऊन तिला हाय-फाइव्ह दिला.
https://www.instagram.com/reel/CdDKadjLK1L/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ पोस्ट करत पुजाराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मैदानावर चांगला दिवस गेल्यानंतर आदितीच्या हाय-फाइव्हइतके चांगले दुसरे काहीच नाही.’
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
इंग्लंडमध्ये पुजारा घालतोय धुमाकूळ
पुजाराचे हे काउंटी चँपियनशीपमधील ५ डावांमध्ये आलेली तिसरी मोठी खेळी आहे. यापूर्वी डर्बीशायरविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात केवळ ६ धावा केलेला पुजारा दुसऱ्या डावात चांगलाच फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने नाबाद २०१ धावांची खेळी केली होती. पुजाराच्या बॅटमधून तब्बल २७ महिन्यांनंतर हे शतक आले होते.
त्यानंतर वॉर्सेस्टशायरविरुद्ध दुसरा सामना खेळताना त्याने पुन्हा शतकी तडाका लावला होता. या सामन्यात त्याने २०६ चेंडूंचा सामना करताना १०९ धावा (Cheteshwar Pujara Century) फटकावल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकारही मारले होते. खराब फॉर्ममूळे पुजाराला भारतीय कसोटी संघातील आपली जागा गमवावी लागली आहे. मात्र आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शानदार लयीत दिसत असलेल्या पुजाराला भारतीय कसोटी संघातील त्याचे स्थान परत मिळू शकते. तो इंग्लंड दौऱ्यावरील पाचव्या कसोटी सामन्यातून संघात पुनरागमन करू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गलती से मिस्टेक! ट्रेंट बोल्टच्या पायाला लागला प्रसिद्ध कृष्णाचा तेजतर्रार थ्रो, धापकन पडला खाली
अंपायरने वाईड दिला म्हणून भडकला सॅमसन, थेट डीआरएसची केली मागणी, पाहा Video
राजस्थानची रुळावरून घसरली गाडी, सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधाराने सांगितली कुठे होतेय चूक?