श्रीलंका क्रिकेट संघाला 1996 मध्ये विश्वविजेता बनवणारे डेव व्हाटमोर यांना नेपाळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्त करण्यात आले आहे. डेव व्हाटमोर यापूर्वी भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील बडोदा संघाचे प्रशिक्षक पद सांभाळणार होते. परंतु भारतीय क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या काळात मानक संचालन प्रक्रियेनुसार 60 पेक्षा अधिक वयाच्या वरीष्ठ नागरिकांना आपल्या संघात सहाय्यक पथकात सामील करू नये, असे राज्यांना सांगितले. त्यामुळे बडोदा संघाने त्यांचा सहायक पथकात समावेश केला नाही.
आतापर्यंत ‘या’ देशांचे राहिले आहेत प्रशिक्षक
66 वयाच्या डेव व्हाटमोर मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर नेपाळ क्रिकेट संघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हणले आहे की, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव व्हाटमोर यांना राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्त करण्यात आले आहे. ते यापूर्वी पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे, या सारख्या संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत.
2008 साली 19 वर्षांखालील भारतीय संघाचे होते प्रशिक्षक
डेव व्हाटमोर हे खुप अनुभवी प्रशिक्षक आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 1996 साली पहिल्यांदा श्रीलंका संघाला वनडे विश्वचषक मिळवून दिला होता. येवढेच नाही तर 2008 साली 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले होते. त्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर त्यांनी काउंटी संघ लंकाशायर संघाचे प्रशिक्षक पद सांभाळले होते. त्यांचे प्रशिक्षक असताना या संघाने दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत आणि नेटवेस्ट कप जिंकला होता.
https://twitter.com/Nepal_Cricket/status/1339529558689685507?s=19
डेव व्हाटमोर यांची कामगिरी
डेव व्हाटमोर यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना 7 कसोटी आणि 1 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्यांची सर्वोच्च धावसंख्या 77 आहे. वनडे त्यांनी फक्त 2 धावा केल्या आहेत. कसोटीत त्यांनी 293 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : विदर्भ एक्स्प्रेस सुसाट! उमेश यादवने पटकविले एकाच षटकात दोन बळी, ऑस्ट्रेलिया ७ बाद ११७
– काँग्रेसचा हा नेता भूषवणार बीसीसीआयचे उपाध्यक्ष पद; २४ डिसेंबरला होणार अधिकृत घोषणा
– आई शप्पथ..!! एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स, पाहा कुठे आणि कोणी केलाय पराक्रम