---Advertisement---

मिलरची भारताविरुद्ध ‘किलर’ खेळी, सामनावीर बनत ‘मिस्टर ३६० डिग्री’चा मोठा विक्रम काढला मोडित

On: शुक्रवार, जून 10, 2022 1:26 PM
David-Miller
---Advertisement---

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील पहिला टी२० सामना पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा शिल्पकार राहिला डेविड मिलर. मिलरने या सामन्यात झंझावाती अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या प्रदर्शनाचे फळ त्याला सामनावीर पुरस्काराच्या रूपात मिळाले. यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

डेविड मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी ठरला तारणहार
यजमान भारतीय संघाच्या (INDvsSA) २१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ९ षटकात ८१ धावांवर वरच्या फळीतील ३ विकेट्स गमावल्या. त्यानंतर रॅस्सी वॅन डर डूसेनला (Rassie Van Der Dussen) साथीला घेत मिलरने (David Miller) संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्याने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या ३१ चेंडूत नाबाद ६४ धावांची झंझावाती खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ४ चौकारही मारले. अर्थात ४६ धावा त्याने बाउंड्रीनेच जोडल्या.

तसेच मिलरने डूसेनसोबत १३१ धावांची अभेद्य भागीदारीही रचली. ही टी२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध भारतातच केली गेलेली सर्वोच्च भागीदारीही ठरली आहे. मिलर-डूसेन जोडीने इंग्लंडच्या जोस बटलर आणि डेविड मलानचा विक्रम मोडत ही कामगिरी आपल्या नावावर केली आहे. यापूर्वी भारताविरुद्ध त्यांच्या मायदेशात टी-२० सामना खेळताना जोस बटलर (Jos Buttler) आणि डेविड मलान (Dawid Malan) यांनी दुसरी सर्वात मोठी भागीदारी केली होती.

मिस्टर ३६० डिग्रीचा विक्रम काढला मोडित
मिलरच्या या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार (Man Of The Match) देऊन गौरवण्यात आले. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीर बनण्याची ही मिलरची आठवी वेळ आहे. यासह तो दक्षिण आफ्रिकेकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी माजी दक्षिण आफ्रिकी फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) याच्या नावे हा विक्रम होता. त्याने ७ वेळा टी२० क्रिकेटमध्ये सामनावीर होण्याचा मान मिळवला होता. परंतु आता मिलरने त्याला मागे सोडले आहे. 

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कुलदीप भावुक, चहलने केले सांत्वन

IND vs SA । पहिला टी२० सामना हरल्यानंतर कर्णधार रिषभ पंतने स्पष्ट केले कारण, म्हणाला…

पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिलेला डेविड मिलर सगळ्यांनाच पुरून उरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---