आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एकटाच लढला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध तुफानी शतक झळकावले, परंतु तो त्याच्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. मिलरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद शतकही झळकावले, पण त्यामुळे संघाचे नशीब बदलू शकले नाही. त्याने नेहमीच आयसीसी एकदिवसीय स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु संघ प्रत्येक वेळी पराभूत होत आहे. (Champions Trophy 2025)
डेव्हिड मिलरने उपांत्य सामन्यात फक्त 67 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद शतक आहे. याआधी 2002 मध्ये कोलंबो येथे इंग्लंडविरुद्ध वीरेंद्र सेहवागने 77 चेंडूत शतक झळकावले होते. तर या वर्षी इंग्लंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात जोश इंग्लिसने तेवढ्याच चेंडूत शतक ठोकून सेहवागची बरोबरी केली होती. शिखर धवनने 2023 मध्ये कार्डिफ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 80 चेंडूत शतक ठोकले होते. 2009 मध्ये सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने 87 चेंडूत शतक झळकावले. (David Miller scored fastest hundred in champions trophy)
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात जलद शतक (चेंडूंच्या बाबतीत) (Fastest hundred in champions trophy history)
67- डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध न्यूझीलंड, लाहोर, 2025
77- वीरेंद्र सेहवाग (भारत) विरुद्ध इंग्लंड, कोलंबो 2002
77- जोश इंग्लिस (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, लाहोर, 2025
80- शिखर धवन (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कार्डिफ, 2013
87- तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2009
डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलर नेहमीच आयसीसी एकदिवसीय बाद फेरीच्या सामन्यांमध्ये संघाकडून लढतो. परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून फारशी साथ मिळत नाही आणि संघ हरतो. 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने 51 चेंडूत 56 धावा केल्या. 2015च्या विश्वचषकातील ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने 18 चेंडूत 49 धावा केल्या. त्याने 2023च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 116 चेंडूत 101 धावा केल्या. आता लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 67 चेंडूत 100 धावा केल्या. मात्र, या सर्व सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ चारही वेळा पराभूत झाला आहे. (David miller Record in icc knockouts)
आयसीसी एकदिवसीय नॉकआउट सामन्यांमध्ये डेव्हिड मिलर
56*(51) विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 उपांत्य फेरी
49(18) विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, विश्वचषक 2015 उपांत्य फेरी
101(116) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, विश्वचषक 2023 उपांत्य फेरी
100*(67) विरुद्ध न्यूझीलंड, लाहोर, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरी
हेही वाचा-
कोहलीने स्टीव्ह स्मिथला दिली भावनिक मिठी, विराटला निवृत्तीबद्दल आधीच माहिती होती का? VIDEO
न्यूझीलंडचा पाकमध्ये विजय; श्रीलंकेचा विक्रम मोडत केली भारताशी बरोबरी
आयसीसी स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दुर्दैवी प्रवास, ‘चोकर्स’चा ठप्पा हटणार कधी?






