ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या ऍशेस कसोटी मालिकेतील (ashes series) तीन सामने पार पडले आहेत. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकले असून, मालिकाही नावावार केली आहे. इंग्लंड संघाचे यावर्षी ऍशेसमधील प्रदर्शन आतापर्यंत निराशाजनक राहिले आहे. इंग्लंडचे फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसले, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (david warner) याने इंग्लंड संघाला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (२८ डिसेंबर) बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा एक डाव व १४ धावांनी पराभव केला. आता डेविड वॉर्नरने इंग्लंड संघाला सल्ला दिला आहे की, त्यांनी सिंथेटीक खेळपट्टीवर सराव करावा. डेविड वॉर्नरच्या मते, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीमध्ये फरक आहे. तसेच इंग्लंडने त्यांच्या सरावाच्या पद्धतीत बदल केला, तर त्यांना फायदा होऊ शकतो. त्याच्या मते इंग्लंडचे फलंदाज ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर चेंडूला जो बाउंस मिळत आहे, त्याच्याशी ताळमेळ साधू शकलेले नाहीत.
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना वॉर्नर म्हणाला की, “फलंदाजीच्या दृष्टीने उसळी खूप मोठे कारण आहे. आम्ही ऑस्ट्रेलियात लहानाचे मोठे झालो असलो आणि येथील खेळपट्ट्यांवर खेळलो असलो, तरीही इंग्लंडच्या तुलनेत आम्ही येथे आमचे सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करू.”
तो पुढे म्हणाला की, “मी शक्यतो इंग्लंडला सिंथेटिक खेळपट्टीवर जाण्याचा आणि बाउंसविरुद्ध सराव करण्याचा सल्ला देईल. तुम्हाला नेहमी तयारी करण्याचे प्रकार शोधावे लागतात. इंग्लंडमध्ये बाउंसविरुद्ध तयारी करण्यासाठी एकमात्र पर्याय आहे सिंथेटिक विकेट.” वॉर्नर असेही म्हणाला की, इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन सामन्यांमध्ये दूरच्या टप्प्याचे चेंडू टाकण्याची चूक केली. तो म्हणाला, “इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे चेंडू चालतात. मात्र, एडिलेड किंवा गाबामध्ये हे चेंडू स्टंप्सला हिट करणार नाही.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत पहिल्या सामन्यापासून वर्चस्व निर्माण तयार करायला सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने २७५ धावांचा मोठा विजय मिळवला होता. तसेच आता तिसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघ जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या –
Video: टीम इंडियाच्या कामगिरीवर कॅप्टन कोहली भलताच खुश, आनंदाने मैदानावरच धरला ठेका
विराट क्रिकेट खेळण्यात व्यस्त असताना, पत्नी अनुष्का हॉटेलमध्ये करत होती असं काही; फोटो आला पुढे
SAvsIND, 1st Test, Live: चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का, शार्दुल स्वस्तात माघारी
व्हिडिओ पाहा –