---Advertisement---

‘या’ 3 विदेशी खेळाडूंनी आयपीएलवर गाजवले वर्चस्व…!

On: शनिवार, ऑगस्ट 17, 2024 6:04 PM
ABD And Gayle
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) अनेक दिग्गज खेळाडूंनी धूमाकूळ घातला. ज्यांची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते एकही सामना पाहायचा सोडत नव्हते. पण आयपीएलमध्ये काही विदेशी खेळाडू भारतीय फलंदाजांना खेळताना मागे टाकतात. आयपीएलमध्ये अनेक विदेशी खेळाडूंनी छाप पाडली आहे. काही विदेशी खेळाडूंचे भारतामध्ये अनेक चाहते आहेत. या बातमीद्वारे आपण अशा 3 दिग्गज विदेशी खेळाडूंविषयी जाणून घेऊया, ज्यांनी सर्वाधिक धावा करुन आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवले.

डेव्हिड वाॅर्नर- डेव्हिड वाॅर्नरनं (David Warner) आयपीएलमध्ये असणाऱ्या दिल्ली फ्रँचायझीकडून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. आयपीएलच्या इतिहासात विदेशी खेळाडू म्हणून वाॅर्नर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. वाॅर्नर 2016ला सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार देखील होता. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादनं 2016ची आयपीएल ट्राॅफी उंचावली होती. वाॅर्नरनं आतापर्यंत 144 आयपीएल सामन्यात 40.52च्या सरासरीनं 6,565 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 62 अर्धशतकांसह 4 शतक ठोकले आहेत.

एबी डिव्हिलियर्स-  एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा विदेशी खेळाडू आहे. डिव्हिलियर्सच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याला ‘मिस्टर 360 डिग्री’ या नावानंदेखील ओळखलं जातं. त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीमुळे भारतीय देखील त्याचे चाहते झाले. आयपीएलच्या कारकीर्दीत त्यानं दिल्ली आणि बंगळुरुकडून खेळताना 184 सामन्यात 39.70च्या सरासरीनं 5,162 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 40 अर्धशतक आणि 3 शतक झळकावली आहेत.

ख्रिस गेल- ख्रिस गेल (Chris Gayle) हा त्याच्या फलंदाजी शैलीमुळे आणि मैदानावरील वेगवेगळ्या कृत्यांमुळे चर्चेत राहिला. त्याला ‘युनिवर्स बाॅस’ या नावानंदेखील चाहते ओळखतात. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा विदेशी खेळाडू आहे. तो कोलकाता, बंगळुरु, पंजाब या फ्रँचायझींसाठी खेळला आहे. त्यानं आयपीएल कारकीर्दीत 142 सामने खेळले आणि 148.96च्या स्ट्राईक रेटनं 4,965 धावा ठोकल्या. त्यामध्ये त्यानं 31 अर्धशतक आणि 6 शतक झळाकावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठोकणारा गेल एकमेव फलंदाज आहे. त्यानं आयपीएलमध्ये नाबाद 175 धावा ठोकल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीबद्दल आम्ही असे काही बोललोच नाही; सीएसकेचे सीईओ विश्वनाथन यांचा खुलासा
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे ‘या’ संघाकडे यजमानपद! क्वालिफायर सामन्यांचे करणार आयोजन
18 वर्षीय फलंदाजानं शानदार शतक झळकावून रचला इतिहास!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---